Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘बिग बॉस 15’ ची स्पर्धक राहिलेली शमिता शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उंच, सडपातळ, मोठे डोळे असलेले शमिताचे व्यक्तिमत्त्व टीव्हीच्या प्रसिद्ध रियॅलिटी शोमधून सर्वांनाच समजले. कोणत्याही अभिनेत्रीला यशस्वी बनवणारे सर्व काही शमितामध्ये आहे, पण तरीही शमिताला ते यश मिळाले नाही, जे तिची बहीण शिल्पा शेट्टीला मिळाले नाही. बुधवारी (2फेब्रुवारी) शमिता आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी…

शमिता शेट्टी बऱ्याच दिवसांपासून सिनेमांमध्ये दिसली नाही. ती गेल्या वर्षी ‘ब्लॅक विडो’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. त्याआधी ती बऱ्याच काळापासून सिनेजगतापासून दूर होती. शमिता एक अभिनेत्री तसेच इंटीरिअर डिझायनर आहे. यासह, ती अनेक ब्रँड एंडोर्समेंटशी जोडली गेली आहे.

शमिता सध्या कोट्यवधीं रुपये कमावत आहे, जरी ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरीही अनेक ब्रँड एंडोर्समेंटशी संबंधित कामांमधून लाखो रुपये कमावतो. शमिताची एकूण संपत्ती 1 ते 5मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये जवळपास 37 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. शमिताने बिग बॉसच्या घरात परत येण्यासाठी भरमसाठ फी घेतली आहे.

हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा

 

‘बिग बॉस’च्या घरात शमिता शेट्टीला राकेश बापटची साथ मिळाली, दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आणि आई सुनंदाच्या बाजूने ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

याव्यतिरिक्त शिल्पा आणि शमिता या बहिणींबद्दल बोलायचं झालं, तर शमिता शेट्टी आणि शिल्पा शेट्टी एकमेकांवर खूप प्रेम करतात. दोघेही एकमेकांच्या सुख-दु:खात सोबत उभे असतात. शिल्पाने तिची बहीण शमितासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली आहे.

‘मोहब्बतें’ नंतर शमिता शेट्टीने ‘जहर’, ‘फरेब’, ‘बेवफा’ या सिनेमात काम केले, पण अभिनेत्रीचा आलेख उंचावण्याऐवजी खालीच पडत राहिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘मी एक सुरक्षित व्यक्ती असून मला माझ्या पत्नीवर…’ अभिषेक बच्चनने सांगितले पतिपत्नीच्या सुखी नात्याचे रहस्य
अर्थसंकल्पात मनाेरंजन क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याने चित्रपट निर्माते संतापले; म्हणाले, ‘आमचा कोणी विचार …’

हे देखील वाचा