Friday, March 13, 2026
Home कॅलेंडर थोडं नवल वाटेल पण हे खरंय… मुलाखत देऊनही विद्या बालनला पहिल्यांदा नकारच मिळाला होता; वाचा संपूर्ण प्रकरण

थोडं नवल वाटेल पण हे खरंय… मुलाखत देऊनही विद्या बालनला पहिल्यांदा नकारच मिळाला होता; वाचा संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिचा १ जानेवारी रोजी ४३ वा वाढदिवस होता. विद्याने तिच्या जिवंत आणि जबरदस्त अभिनयाने खुप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विद्याला तिच्या अभिनयासाठी आजवर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

तिच्या चित्रपटातील अभिनयाची सुरुवात २००५ साली आलेल्या ‘परिणिता’ चित्रपटापासून केली. मात्र, याआधी विद्या छोट्या पडद्यावरील यशस्वी अभिनेत्री बनली होती. विद्याने एकता कपूरच्या लोकप्रिय अशा ‘हम पांच’ मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले. मात्र, यासाठी तिला मोठे प्रयत्न करावे लागले होते.

या लेखात आपण विद्याच्या पहिल्या काळातील संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत.

विद्याने हम पांच या मालिकेसाठी सुरुवातीलाच ऑडिशन दिले होते. मात्र, काही कारणामुळे तिची निवड केली नाही. मग हम पांच सिरीयल सुरु झाली. जवळपास या मालिकेचे १०० भाग झाले असतील तेव्हा विद्याला या मालिकेतील एका भूमिकेसाठी विचारणा केली गेली. विद्या एवढी मोठी संधी सोडणाऱ्यातली नव्हती. तिने त्वरित होकार कळवला आणि तिला हि मालिका करायला मिळाली.

मालिकेबद्दल आणि या भूमिकेबद्दल एकदा विद्याने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी ह्या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. मात्र, माझे सिलेक्शन झाले नाही. त्यानंतर काही दिवसांनी ही मालिका ऑन एअर झाली. मी आणि माझी आई रोज टीव्ही समोर बसून ही मालिका न चुकता बघायचो. एक दिवस अचानक मला एकता कपूरचा फोन आला आणि तीन मला या मालिकेतील रुढींची भूमिका करायला आवडेल का? असे विचारले. मी क्षणाचाही विलंब न लावता त्वरीत होकार दिला.’

‘तेव्हा मी फक्त ओरडायची बाकी होती एवढा आनंद मला झाला होता. त्यानंतर मी राधिका माथूर ही भूमिका करायला लागली. मी या शो मध्ये आली तेव्हा सर्व कलाकार रुळले होते. मी मधेच एन्ट्री घेतल्यामुळे मला खूप दडपण आले होते, मात्र तयांनी मला खूप छान सर्वांमध्ये सामावून घेतले. आम्ही या शो मध्ये खूप मस्ती केली. सर्व कलाकारांना आम्ही काही ओपन नाव दिली होती, त्याच नावावरून आम्ही सर्वाना हाक मारायचो. सलवार सूट घालणारी, डोळ्यांना मोठा चष्मा लावणाऱ्या राधिकाने मला खूप काही दिले.”

त्यानंतर विद्याने चित्रपटांकडे तिचा मोर्चा वळवला. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून विद्याने तिची अभिनयाची ताकद सिद्ध केली. आज विद्या बॉलिवूडच्या मोठ्या नायिकांमध्ये गणली जाते. विद्याला तिच्या पुढील कारकिर्दीसाठी दैनिक बोंबाबोंबकडूनही खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा