Wednesday, July 3, 2024

Rajat Kapoor Birthday | चित्रपटासाठी मित्राकडे केली पैशांची मागणी, अभिनेत्यावर ‘मी टू’चेही लागले होते आरोप

रजत कपूर (Rajat Kapoor) यांना आज परिचयाची गरज नाही. बॉलिवूडचे हे अभिनेते आणि दिग्दर्शक सर्वांनाच माहीत आहेत. एक चांगले अभिनेते असण्यासोबतच ते एक चांगले दिग्दर्शक तसेच पटकथा लेखक देखील आहे. रजत यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु विशेषतः ते आमिर खानचा चित्रपट ‘दिल चाहता है’, ‘मान्सून वेडिंग’ आणि ‘भेजा फ्राय’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या सर्व चित्रपटांमध्ये रजत यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रजत शुक्रवारी (११ फेब्रुवारी) त्यांचा ६१वा वाढदिवस साजरा करत आहेत.

रजत कपूर यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९६१ रोजी नवी दिल्ली येथे झाला. रजत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. या छंदामुळे ते दिल्लीतील चिंगारी थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. त्यानंतर पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तपशील जाणून घेतला. अनेक चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रजत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका वादामुळे त्यांच्या आयुष्यात संकटं का आली हे सांगितले आहे.

चित्रपट बनवण्यासाठी रजत कपूर यांना मित्रांची मिळाली साथ
रजत यांची लहानपणापासूनची इच्छा चित्रपट बनवण्याची होती. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रजत यांनी ‘रघु रोमियो’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट करण्यासाठी रजत यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांना ईमेल करून पैसे मागितले. मित्रांनीही रजत यांना मदत केली, पैसे मिळाले आणि चित्रपट बनला. खेदाची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. जरी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण प्रेक्षकांच्या कसोटीला उतरला नाही. ‘मी टू’ चळवळीदरम्यान रजत यांचे नाव चर्चेत आले होते. रजत यांच्यावर एका महिला पत्रकाराशिवाय इतर २ जणांनीही आरोप केले होते.

रजत कपूर यांच्यावर झाले होते आरोप
जेव्हा २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा बॉलिवूडमधील ‘मी टू’ चळवळीदरम्यान अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवरही आरोप करण्यात आले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, यादरम्यान एका पत्रकाराने आरोप केला होता की, एका मुलाखतीदरम्यान रजत कपूर तिला म्हणाले की, तिचा आवाज इतका मादक आहे की, ती दिसायला अशीच आहे? याशिवाय माझ्या शरीराचे माप विचारत राहिले. एकाने आरोप केला आहे की, रजत यांनी त्याला फ्लॅटवर एकटे फिरायला सांगितले होते. एका मुलीने सांगितले होते की, “दिग्दर्शनाच्या दृष्टीने मी त्यांना गुरु मानत असे, मी त्यांच्यावर विश्वास ठेवत असे, पण त्यांनी जबरदस्तीने माझी किस घेतली. त्यांच्या या कृतीने मी हादरले.”

रजत कपूर यांनी मागितली माफी
मात्र, या आरोपांनंतर रजत कपूर यांनी ट्वीट करत माफी मागितली होती. रजत यांनी ट्वीट केले होते की, “मी नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा आणि योग्य ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या कृतीने आणि बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो.”

‘कायल गाथा’मधून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात
अभिनेता रजत यांनी १९८९मध्ये आलेल्या ‘कायल गाथा’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर समीक्षक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. १९९० पासून त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘एजंट विनोद, ‘किसना’, ‘कॉर्पोरेट’, ‘ये क्यूँ होता है’, ‘दृश्यम मिडनाईट चिल्ड्रन’ यांसारख्या चित्रपटांसह त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा