वाढदिवस, वाढदिवस आणि फक्त वाढदिवस. हा महिना वाढदिवसांनी भरलेला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार या महिन्यात आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक रजत कपूर यांचाही समावेश आहे. रजत कपूर आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९६१ रोजी राजधानी दिल्ली येथे झाला होता. त्यांना ‘भेजा फ्राय’, ‘कॉर्पोरेट’, ‘दिल चाहता है’, ‘मान्सून वेडिंग’ आणि ‘फँस गए रे ओबामा’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. रजत कपूर यांनी आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीमधून पूर्ण केले होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची जबरदस्त आवड होती. ही आवड पूर्ण करण्यासाठी त्यांंनी थिएटर जॉईन केले होते.
यानंतर अभिनयातील बारकावे शिकल्यानंतर फिल्म ऍँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ऍडमिशन घेतले. रजतने ‘मंडी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कमर्शियल आणि पॅरलल चित्रपटांमध्ये काम केले. रजत अशा चित्रपटांचा भाग बनले, ज्यांचे बजेट खूपच कमी होते. त्यांचे अनेक सिनेमे हे हास्यमुद्द्यांवर आधारित होते, जे चाहत्यांना खूप आवडले. त्यांच्या वाढदिवशी आपण त्यांच्या आयुष्यातील ५ सर्वोत्तम चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत.
१. भेजा फ्राय (२००७)
सन २००७ मध्ये सागर बल्लारी दिग्दर्शित ‘भेजा फ्राय’ हा एक कॉमेडी चित्रपट होता. यामध्ये रजत कपूर यांच्याव्यतिरिक्त विनय पाठक आणि रणवीर शौरी यांचाही समावेश होता. हा चित्रपट खूपच कमी बजेटमध्ये बनला होता, असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बजेटच्या चौपट कमाई केली. या चित्रपटात रजत कपूर आणि विनय पाठक यांच्यात झालेली मुलाखत दाखवण्यात आली आहे.
https://youtu.be/BnDcsRmuU9Q
२. कॉर्पोरेट (२००६)
सन २००६ साली आलेल्या ‘कॉर्पोरेट’ चित्रपटात रजत कपूर यांनी उद्योगपतीची भूमिका साकारली होती. यामध्ये ते उद्योजकाची भूमिका साकारणाऱ्या राज बब्बर यांच्याशी स्पर्धा करताना दाखवले आहे. या चित्रपटात बिपाशा बासू आणि केके मेनन यांच्या अभिनयाचे जलवेही दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटानेही आपल्या बजेटपेक्षा चौपट कमाई केली होती.
३. फँस गए रे ओबामा (२०१०)
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘फँस गए रे ओबामा’ हा एक कॉमेडी चित्रपट होता. अमेरिकेत आलेल्या मंदीने त्रस्त भारतीय मूळ असलेल्या एका कुटुंबाची गोष्ट यामध्ये दाखवली आहे. यामध्ये रजत कपूर यांच्यासोबत नेहा धुपिया, संजय मिश्रा यांनीही भूमिका साकारल्या आहेत. अमेरिकेत व्यवसाय नष्ट झाल्यानंतर रजत कपूर आपले वडिलोपार्जित घर विकण्यासाठी भारतात येता आणि किडनॅप होतात. यानंतर ते चतुरपणे त्यांच्या तावडीतून बाहेर पडण्यात यशस्वी होतात.
https://youtu.be/c1_KTfy5Z4c
४. आय ऍम २४ (२०१०)
सौरभ शुक्ला दिग्दर्शित ‘आय ऍम २४’ हा चित्रपट एका टक्कल असलेल्या व्यक्तीवर आधारित आहे. यामध्ये रजत कपूर हे मुख्य भूमिकेत होते, तर सौरभ शुक्ला, रणवीर शौरी आणि नेहा धुपिया हेही या सिनेमात सामील होते.
५. आँखो देखी (२०१४)
रजत कपूर यांच्या सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये ‘आँखो देखी’ या चित्रपटाचा समावेश आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत संजय मिश्रा होते. परंतु या चित्रपटाची पटकथा रजत कपूर यांनी लिहिली आहे आणि त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
https://youtu.be/WgsHYW1t-Po
चित्रपटात जीवनातील अनेक दर्शनीय पैलूंना दाखवले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज