Wednesday, July 3, 2024

उर्फी जावेदच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मी तिला थोबडवून काढेन…’

बिग बॉस OTT नंतर प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद तिच्या विचित्र शैली आणि बोल्ड आउटफिट्ससाठी ओळखली जाते. फराह खान अली, चेतन भगत आणि इतर तिच्या असामान्य फॅशन सेन्सबद्दल तिच्यावर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे, रणवीर सिंग, मसाबा गुप्ता यांसारख्या इतर तिचे केस, मेकअप आणि डिझाइनचे कौतुक करतात. अशातच, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरुध्द पाेलिसांकडे कारवाईची मागणी करत तिच्यावर संतप्त टिका केली आहे. 

भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, “उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही नंगटनाच कराल. आम्ही पाेलिसता तक्रार केली आहे त्यावर कारावाई व्हायरलाच हवी.” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

उर्फीने केलेल्या ट्विटला प्रतिउत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, “तिने ज्या अश्लिल भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटतं आहे. पोलिसांत केलेल्या तक्रारीचा मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आज तिने ट्वीट केलंय, पण उद्या मला जर ती कुठे भेटली, तर पहिले मी तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही.” असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असे उघडे नागडे फिराल तर त्याचा प्रसाद तुम्हाला मिळेलच असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीवर उर्फीने चाेख उत्तर दिले होते. त्यामुले आता हे प्रकरण आणखीनच वाढले आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस नेमकी काय ठोस पावलं उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(bjp leader chitra wagh again warns tv actress uorfi javed she wants strict action against influencer)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मृणाल ठाकूरच्या नवीन दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा, नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

‘आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत…’, अभिनेत्री अश्विनी महांगडेने हाती घेतला नवीन वसा

हे देखील वाचा