Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड भाजप आमदार राम कदमांचा इशारा! म्हणाले, ‘आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’

भाजप आमदार राम कदमांचा इशारा! म्हणाले, ‘आदिपुरुष महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’

ऐतिहासिक सिनेमे आणि वाद यांचं फार जुनं नातं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, जेव्हाही कोणता दिग्दर्शक एखाद्या ऐतिहासिक विषयावर सिनेमा घेऊन येतो, तेव्हा त्यातील पात्र, कथा, दृश्य, गाणी आणि बऱ्याच गोष्टींवरून नेटकरी तसेच विविध क्षेत्रातील लोक सिनेमावर ताशेरे ओढतात. असेच काहीसे आता मराठी दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष‘ या सिनेमासोबत घडताना दिसत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यावर आता प्रेक्षकांनी आगपाखड करण्यास सुरुवात केलीये. यामध्ये राजकीय व्यक्तीही उडी घेतायेत. त्यात भाजपचे आमदार राम कदम यांचाही समावेश आहे.

आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी तिखट शब्दात या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी ओम राऊत (Om Raut) यांचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

ट्वीटमध्ये काय म्हणाले राम कदम?
आमदार राम कदम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट करत सिनेमावर टीका केली. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की, “आदिपुरुष हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या सिनेमात पुन्हा एकदा निर्मात्यांनी पब्लिसिटीसाठी आमच्या देवी-देवतांचा अपमान केला आहे. तसेच, त्यांनी कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावनाही दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. एकतर फक्त माफीनामा किंवा विडंबन.

याव्यतिरिक्त त्यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “अभिनेता सैफ अली खान याने त्याच्या आगामी आदिपुरुष सिनेमाबाबत खळबजनक वक्तव्य केले आहे. रावणाची भूमिका साकारणारा सैफ म्हणतो की, रावणाने सीता मातेचे अपहरण केलं, ते या सिनेमात न्याय असेल. या सिनेमात रावणाची मानवी बाजू दाखवली जाईल. तसेच, श्री राम यांच्यासोबत त्याचे युद्ध हे सिनेमात न्याय ठरेल.”

‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दल थोडक्यात
या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात वापरलेल्या व्हीएफएक्सवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. याव्यतिरिक्त सिनेमातील कलाकारांच्या पात्रांच्या वेशभूषेवरूनही एकच चर्चा रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

या सिनेमात अभिनेता प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, ओम राऊत यांनी बनवलेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाला वाहवा मिळाली होती. तसेच, राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मात्र, ‘आदिपुरुष’ या सिनेमामुळे ते सध्या चांगलेच वादात अडकले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! ‘रावणा’ने हेमा मालिनीच्या कानाखाली वाजवलेल्या 20 चापटा, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का
प्रख्यात गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक, प्रकृती अत्यंत गंभीर! जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

हे देखील वाचा