Saturday, April 20, 2024

प्रख्यात गायक उदित नारायण यांना हार्ट अटॅक, प्रकृती अत्यंत गंभीर! जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

सोशल मीडियावर बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या व्हायरल होतायेत. या बातम्यांमुळे गायकाच्या चाहत्यांसोबत आख्खी इंडस्ट्रीत खळबळ उडाली. अतिशयोक्ती म्हणजे, काही चाहत्यांनी गायकाला श्रद्धांजलीदेखील वाहण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर Udit Narayan Heart Attack हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मात्र, यामागील सत्य नेमकं आहे तरी काय? माध्यमांतील वृत्तांनुसार, बुधवारी (दि. 5 ऑक्टोबर) रात्रीपासून उदित यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होऊ लागल्या होत्या. आता या प्रकरणावर उदित यांच्या मॅनेजरने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

काय म्हणाला उदित नारायण यांचा मॅनेजर?
दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ माजली. त्यासाठी त्यांचे चाहते त्यांची तब्येत आता कशी आहे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांमागील सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, गायकाच्या चाहत्यांनी घाबरण्याची काहीच गरज नाहीये. उदित यांच्या मॅनेजरने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. त्यांनी गायकाला आलेल्या हृदयविकाराच्या बातम्यांचे खंडन करत म्हटले की, काल रात्रीपासून त्यांना बरेच फोन येत आहेत. मॅनेजर पुढे म्हणाला की, “काल रात्री माझी उदित यांच्याशी याबद्दल चर्चा झाली. तेदेखील या खोट्या बातम्यांमुळे चिंतेत आहेत.” मॅनेजरने उदित नारायण एकदम ठणठणीत असल्याची पुष्टी केली आहे.

उदित नारायण यांच्या हृदयविकाराच्या बातमीचे नेपाळ कनेक्शन?
उदित नारायण यांच्या हृदयविकाराच्या अफवा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अशात या बातमीबद्दल सोशल मीडियावर अनेक खोटे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, अशा बातम्या पसरवणाऱ्यांमागे जबाबदार कोण आहे? याची माहिती अद्याप समजली नाहीये, परंतु एक खास माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ज्या फोन नंबरवरून ही खोटी बातमी पसरवण्यात आली, तो फोन नंबर नेपाळचा आहे. या फोन नंबरच्या पुढे नेपाळचा कोड आहे.

उदित नारायण यांच्याबद्दल थोडक्यात
उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर, 1955 रोजी बिहारच्या सुपौल जिल्ह्याच्या बायस गोठ या गावात झाला आहे. उदित हे 90च्या दशकातील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांची गाणी आजही लोक आवडीने ऐकतात. त्यांनी त्यांचे पहिले हिंदी गाणे मोहम्मद रफी यांच्यासोबत गायले होते. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘जो जीता वहीं सिकंदर’ सिनेमातील ‘पेहला नशा’, ‘मोहरा’ सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’, ‘कयामत से कयामत तक’ सिनेमातील ‘ऐ मेरे हमसफर’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संजय मिश्रा यांना आयुष्यात बसला होता मोठा धक्का, लाज बाजूला ठेवत करायचे ‘हे’ काम
शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते 28 टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

हे देखील वाचा