Thursday, December 4, 2025
Home कॅलेंडर आधी श्रद्धांजली, आता राजकारण? लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यावरून वाद

आधी श्रद्धांजली, आता राजकारण? लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्यावरून वाद

भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवार (६ फेब्रुवारी) रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रात आणि संपूर्ण देशावर शोककळा पसरली. रविवारी सायंकाळी लतादिदींना अखेरचा निरोप मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे देण्यात आला. शासकीय इतमामात लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कवर दहन करण्यात आले.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या अंत्यविधीला सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी यांची तर झाडून उपस्थिती असल्याचे दिसून आले. अनेक राजकारण्यांनी अगदी पंतप्रधान मोदींसह अनेकांनी लता दिदी गेल्याचे वृत्त समजताच त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळीही बहुतेक नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती.

मात्र, लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीला २४ तास उलटत नाहीत तोच त्यांच्या नावाने नव्या राजकारणाचा उदय झाल्याचे दिसून आले. ज्यांनी लता दिदींना श्रद्धांजली वाहिली तेच नेते आता त्यांंच्या नावाने राजकारण करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि राजकारणाचा मुद्दा ठरतोय, ते म्हणजे लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारणे किंवा लता मंगेशकर यांचे स्मारक उभारणे. (Dispute Over Erection Of Lata Mangeshkar Memorial)

हेही वाचा – Lata Mangeshkar | अलौकिक स्वर हरपले..! ठाकरे, पवार ते फडणवीस; वाचा लतादिदींच्या निधनावर राज्यातील राजकारण्यांच्या प्रतिक्रिया

लता मंगशेकर यांचे स्मृती स्थळ दादर येथील शिवाजी पार्क याठिकाणी उभारावे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. तर, शिवाजी पार्क येथेच लतादीदींचे आता स्मारक बनवावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (Politician Requesting Memorial For Late Singer Lata Mangeshkar At Shivaji Park)

काय म्हणाले आमदार राम कदम? (BJP MLA Ram Kadam Writes To CM Uddhav Thackeray)

भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून लतादिदींचे स्मृती स्थळ उभारा अशी मागणी केली आहे.

‘माननीय मुख्यमंत्री उद्भव ठाकरेजी स्वर्गीय लतादीदी यांचा अंत्यसंस्कार झाला, त्या शिवाजी पार्कमध्ये स्वर्गीय लतादीदींचे स्मृतीस्थळ बनवावे, ही मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे.’ असा संदेश आणि त्यासोबत एक पत्रच आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी असंच एक विनंती पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना पाठवले आहे.

राम कदम यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही असेच एक विनंती पत्र पाठवले आहे.

हेही वाचा – लता मंगेशकर अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन; वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर | RIP Lata Mangeshkar

भाजपा पाठोपाठ काँग्रेसचीही मागणी…

‘लता मंगेशकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे. जगभरातील लोकांना या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरणात राहिल’ असे नाना पटोले यांनी म्हटले. यामुळे आता भाजपा प्रमाणेच काँसनेही स्मारकाबाबत अनुकूल भुमिका दाखवलीये.

शिवसेनेची भुमिका काय? (MP Sanjay Raut on Requesting Memorial For Late Singer Lata Mangeshkar)

भाजपा आणि काँग्रेस यांच्या स्मारकारच्या मागणीला शिवसेनेचा विरोध असल्याचे दिसत आहे. त्यातही हा विरोध शिवाजी पार्क येथे स्मारक अथवा स्मृतीस्थळ नको, यामुळे असावा असंही वाटतंय. मात्र, ही बाब बोलताना शिवसेनेचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वापरलेले शब्द आणि भाषा मात्र वेगळी आहे. ज्यात ते बोलतात की,

“लतादीदी कायम स्मरणात राहतील. काही जणांनी त्यांच्या स्मारकाची मागणी केली आहे. परंतू, त्या मागणीची गरज नाही. याचे कुणीही राजकारण करू नका” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणालेत

अधिक वाचा – एका युगाचा अंत…! गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, कलाविश्वावर शोककळा

एकूणच लता मंगेशकर यांच्या निधनावर डोळ्यात अश्रू आणून श्रद्धांजली वाहणारे नेते आता त्यांच्या स्मारकाचा मुद्दा पुढे करुन राजकारण करणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, स्मारक अथवा स्मृती स्थळ बाबतीत उभारणी करा आणि स्मारकाची आवश्यकता नाही असे बोलणारे दोन गट पडल्याचे निदर्शनास येत असल्याने ही बाब आता वादाचे स्वरुप घेणार का, हे पाहावे लागेल.

अधिक वाचा – लता दिदींसाठी दुआ मागितल्यानंतर शाहरुख खान पार्थिवावर थुंकला? जाणून घ्या खरे वास्तव, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा