Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड सीएम शिंदेच्या समर्थनार्थ आली कंगना, शंकराचार्यांच्या वक्तव्यावर म्हणाली; ‘नेता राजकारण नाहीतर कात पाणीपुरी विकणार का?

सीएम शिंदेच्या समर्थनार्थ आली कंगना, शंकराचार्यांच्या वक्तव्यावर म्हणाली; ‘नेता राजकारण नाहीतर कात पाणीपुरी विकणार का?

बॉलिवूड अभिनेत्री आणि आता राजकारणार प्रवेश घेतलेली कंगना रणौत (Kangana Ranaut) ही तिच्या वादग्रस्त विधानांमूळे कायमच चर्चेत असते. ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही दिवसापूर्वी मुंबई येथे महाराष्ट्र राजकीय नेत्यांविरोधात काही विधान केली होती. त्यानंतरअनेक राजकीय नेते त्यावर आपलं मत नोंदवताना दिसत आहे. यात कंगना सुद्धा मागे राहीली नाही. तिनेही आपलं मत या सगळ्यावर मांडल आहे.

१२जूलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांनी मुंबई येथे लग्नगाठ बांधली. या लग्नात अनेक दिग्गज सिलीब्रटींनी हजेरी लावली. त्या लग्नात देश विदेशातील अनेक मोठे लोक सहभागी झाले होते. त्यात अंबानी परीवाराने आपल्या हिंदू धर्माचीमूळ न विसरता त्यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण हिंदू संस्कृतीतील धार्मिक गुरूशंकराचार्य, स्वामीभद्राचार्य, भाग्यश्वरधामचे धिरेनशास्त्रीयांच्यासह अनेक धार्मिक हिंदू गुरूंनी या समारंभात हजेरी लावली होती.

ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची महाराष्ट्राचे पुर्व मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यावर ते त्यांच समर्थंन करत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राजकारणात धोका झाला आहे. शंकराचार्य हे सुद्धा म्हणाले की, हिंदू धर्मात विश्वासघात हे एक खूप मोठं पाप आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या विषयाला धरून खूप चर्चा होत आहे. त्यावर२०२४पासून मंडी येथून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेली कंगना रणौत हिने आपली प्रतिक्रिया दिली.

कंगना महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे यांच समर्थन करत तीने एक पोस्ट टाकली आहे. त्यात कंगना म्हणते नेता राजनिती नाही करणार तर काय फक्त पाणीपुरी विकणार का?राजकारणात गटबंधन, पार्टी एकत्र येणे,वेगळी होणे खूप साधी गोष्ट आहे जी संविधानाला मान्य आहे. कांग्रेस पीर्टीच विभाजन १९०७ मध्ये आणि नंतर १९७१ मध्ये झालं होतं.राजकारणात राजकारणी राजकारण नाही करणार तर काय पाणीपूरी विकणार का?

कंगनाने शंकराचार्यच्या शब्दावर प्रश्न विचारत एक पोस्ट लिहली,’शंकराचार्य यांनी आपल्या धार्मिक प्रभाव,शब्दावली अणि धार्मिक शिक्षा यांचा गैरवापर केला आहे.धर्म असही म्हणतो राजात प्रजेच शोषण करत असेल तर राजद्रोह शेवटचा धर्म आहे.असे खडे बोल कंगनाने आपल्या पोस्ट मधून शंकराचार्य यांना सुनवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

लग्नाच्या 4 वर्षानंतर नताशा आणि हार्दिकने घेतला घटस्फोटाचा निर्णय; सोशल मीडियावर दिली माहिती
अली फझल अली रिचा चड्डा झाले आई-बाबा; गोंडस मुलीचे केले स्वागत

हे देखील वाचा