Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

राम गोपाल वर्माविरोधात मुंबई न्यायालयात पोहोचला भाजप कार्यकर्ता, मुर्मूवर केलं होतं वादग्रस्त ट्वीट

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे अडचणीत आले आहेत. नुकताच भारतीय जनता पक्षाचा (भाजप) कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने चित्रपट निर्मात्याविरोधात मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. राम गोपाल वर्मा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप या व्यक्तीने केला आहे.

१४ जुलै रोजी दिली होती तक्रार 
तक्रारदार सुभाष राजोरा यांचे वकील डीव्ही सरोज यांनी शनिवारी सांगितले की, सुभाष यांनी याप्रकरणी १४ जुलै रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराने वांद्रे महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ४९९ आणि ५०० ​​(बदनामी), ५०४ (कोणत्याही व्यक्तीचा हेतुपुरस्सर अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) अंतर्गत चित्रपट निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. (bjp worker moves mumbai court against director ram gopal varma)

खटल्याच्या सुनावणीला ११ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती
त्यांनी सांगितले की, दंडाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावरील महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचला होता. त्यांचे ट्वीट हे अनुसूचित जाती (SC) लोकांचा अपमान करण्यासारखे आहे.

काय होतं ट्वीट?
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी २२ जून रोजी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ट्वीट केले होते. त्यांनी लिहिले की, “जर द्रौपदी राष्ट्रपती असेल, तर पांडव कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांडव कोण आहेत?” वर्मा यांच्या या ट्वीटवर सोशल मीडिया यूजर्सनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. मात्र, दोन दिवसांनंतर वर्मा यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा