ब्लॅक पँथरच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नुकताचं ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोमवारी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, जो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्लॅक पँथर‘(Black panther) चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. मार्वलने आज ‘ब्लॅक पंथर: वाकांडा फॉरएव्हर चा नवीन ट्रेलर आणि पोस्टर लाँच केला आहे, ज्याने सर्वांचे डोळे उघडले आहेत.
‘ब्लॅक पँथर’एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये मार्वलने चाहत्यांना नवीन ब्लॅक पँथरची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. समोर आलेल्या ट्रेलरच्या सुरुवातीला, वाकांडों त्याच्या टिचला म्हणजेच राजा अभिनेता चॅडविक बोसमनच्या अनुपस्थितीत संघर्ष करताना दाखवण्यात आला आहे. वाकांडाचे सर्व शत्रू तिचलाच्या देशाचा नाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते वाकांडाच्या लोकांशी युद्धाची तयारी करत आहेत. नवीन ब्लॅक पँथर सोबत, ट्रेलरमध्ये एका नवीन खलनायकाची धमाकेदार एंन्ट्री देखील दाखवली आहे, ज्याचा धोका वाकांडावर आहे. अशा परिस्थितीत आणखी एक ब्लॅक पँथर आपला देश वाचवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे. यासोबतच एक नवा सुपरहिरोही पाहायला मिळत आहे. ब्लॅक पँथर म्हणजेच चेडविक बोसमनच्या मृत्यूनंतर आता त्याची बहीण वाकांडातील लोकांचे रक्षण करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ट्रेलरमध्ये वाकांडाच्या राजकारणाची आणि रणनीतीचीही झलक पाहायला मिळते.
‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये वाकांडाच्या राजकारणाची आणि रणनीतीचीही झलक पाहायला मिळते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माता दुर्गाच्या पुजेला बॉलिवूड कलारांची गर्दी, देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचले ‘हे’ दिग्गज कलाकार
एकट्या करिनाला विमानतळावर पाहून चाहते झाले ‘अनकंट्रोल’, बेबोची पळताभुई थोडी, कुणी हात धरला तर कुणी…