Friday, May 24, 2024

ब्लाइंड टीझर: सीरियल किलरच्या शोधात निघाली सोनम कपूर, 4 वर्षांनंतर परतणार रुपेरी पडद्यावर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच ‘ब्लाइंड‘ चित्रपटातून इंडस्ट्रीत पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट 7 जुलैला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. अशात मंगळवारी (27 जुलै)ला या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा टीझर रिलीज केला. टीझरमध्ये सोनम एका अंध मुलीच्या भूमिकेत आहे, जी कॅब घेते, ज्याला पूरब कोहली चालवत आहे. मग तिला कळते की, कॅबच्या ट्रंकमध्ये कोणीला तरी कैद केले आहे.

यूकेमध्ये महिलांचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. टीझरचा शेवट एका फोन कॉलने होतो, ज्यामध्ये अपहरणकर्ता त्यांना त्यांचा पाठलाग न करण्याची चेतावणी देतो. यावर सोनम म्हणते, ‘मी हे सर्व संपवणार आहे.’

कोरोनाच्या काळात शूट झाला चित्रपट
कोरोना महामारीच्या काळात ग्लासगोमध्ये ब्लाइंडचे शुटींग करण्यात आले हाेते. या चित्रपटात विनय पाठक आणि लिलेट दुबे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लॉकडाऊनच्या निर्बंधांना न जुमानता चित्रपटाच्या क्रूने 39 दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

अशात माध्यमांशी केलेल्या बातचीतमध्ये साेनमने सांगितले की, ‘तिने प्रेग्नंसीमध्ये काेणताही चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यामुळे ब्लाइंडचे शुटींग प्रेग्नंसीपुर्वी झाले.’ सोनमने मे 2022 मध्ये तिच्या पहिला मुलगा वायुला जन्म दिला. त्यामुळे तिने माध्यमाला सांगितले की, ‘या कारणास्तव कामावर अजिबात परिणाम झाला नाही. मी प्रेग्नंसीदरम्यान काम न करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य होता. मला थोडा मोकळा वेळ मिळाला. आता मी कामावर परत येत आहे.’ मंडळी, ‘ब्लाइंड’ चित्रपट पुढच्या महिन्यात जिओ सिनेमावर रिलीज होत आहे. (blind teaser out sonam kapoor blind character in search for serial killer)

अधिक वाचा-
षडयंत्र की निर्मात्यांची अव्वाच्या सव्वा मागणी; काय रोखतंय केरळा स्टोरीला ओटीटीवर येण्यापासून, लगेच वाचा
गुलाबी साडी नेसून अक्षरा सिंगने घातली नवऱ्याला भुरळ, अभिनेत्रीचे ‘कनबलिया से धक्का’ गाणे रिलीज

हे देखील वाचा