Friday, December 1, 2023

सोनम कपूरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा; म्हणाली, “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”

बाॅलिवूडमध्ये सोनम कपूरला स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. ती तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमाच चर्चेत असते. अशातच सोनम नुकतीच एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोनमने सावंरिया चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पन केले आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातून तिने एक वेगळीच ओळख निर्माण केली.

सोनमने (Actress Sonam Kapoor) सध्या एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, “प्रत्येक व्यक्ती लहानपणी कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी पडत असतो. मी लहान असताना माझाही विनयभंग झाला. त्यावेळी माझ्याबरोबर भयंकर मोठा अपघात झाला होता. पण ही गोष्ट कोणाला ही सांगण्याची माझी हिंमत होत नव्हती. तीन ते चार वर्ष ही गोष्ट मी कोणालाच सांगितली नव्हती. मात्र आजही ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते.”

पुढे बोलताना सोनम म्हणाली की, “मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये ही घटना घडली होती. मी आणि माझी मैत्रिण चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी खावू घेण्यासाठी आम्ही दोघी बाहेर दुकानात गेलो होतो. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने माझे स्तन दाबले. यावेळी मी खूप घाबतली होती. मी कुठे आहे, काय होतये हे मला काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी तिथच मोठ मोठ्याने रडायला लागले. त्यानंतर मी पुर्ण चित्रपट बघितला. त्यावेळी मी चुकी केली आहे असे मला वाटले.”

सोनमविषयी बोलायच झाले तर, आनंद आहुजाला दीर्घकाळ डेट केल्यानंतर अभिनेत्रीने 8 मे 2018 रोजी विवाह बंधनात अडकली. त्यानंतर तिने 20 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मुलगा वायुला जन्म दिला. सध्या सोनम तिच्या कुटुंबात व्यस्त आहे. साेनम कपूरच्या अभिनय काराकिर्द बाेलायचे झाले तर, तिने ‘सावरिया’, ‘संजू’,’नीरजा’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (Actress Sonam Kapoor told ‘that’ shocking story)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा
27 वर्षांनी भारतात हाेणार ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा, 130 देशातील स्पर्धकांचा असेल समावेश

हे देखील वाचा