Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड ऍनिमल चित्रपटात ‘अबरार’ करणाऱ्या बाॅबी देओलला झाला होता भयानक अपघात, अजुनही आहे पायात राॅड

ऍनिमल चित्रपटात ‘अबरार’ करणाऱ्या बाॅबी देओलला झाला होता भयानक अपघात, अजुनही आहे पायात राॅड

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला ऍनिमल(Animal) चित्रपट अजुनही चर्चेत आहे. यानिमित्तानेच या चित्रपटातील कलाकारदेखील चर्चेत आहेत. त्यांच्या या चित्रपटातील भुमिकाच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील यामुळे चर्चा होत आहेत. या चित्रपटात खलनायकाची भुमिका करणारा अभिनेता बाॅबी देओलदेखील त्याने निभावलेल्या अबरार(Abrar) या पात्रामुळे चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. अशातंच त्यानेे एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातील आतापर्यंत कधीही न सांगितलेले काही प्रसंग शेअर केले.

तसं अभिनेत्यांनी स्टंट करणं आणि त्यातुन एखादी दुखापत होणं बाॅलिवूडसाठी काही नवीन नाही. आजकाल जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये स्टंट किंवा फाइटींग सिन असतात, त्यामुळे अभिनेत्यांना ते सीन करावे लागतात. परंतु हे स्टंट करणं दिसतं तितकंही सोपं नसतं. यामुळे अनेक अभिनेत्यांना आणि काही अभिनेत्रींनाही दुखापती झालेल्या आहेत. नुकतेच ऍनिमल चित्रपटात अबरारची भुमिका करणाऱ्या बाॅबी देओलने(Bobby Deol) त्याच्या आयुष्यातील असाच एक प्रसंग मुलाखतीत शेअर केला आहे.

बाॅबीच्या पहिल्याच चित्रपटात झाला जबरदस्त अपघात
बरसात(Barsat) हा बाॅबी देओलचा सुपरहिट चित्रपट आहे. याच चित्रपटातुन त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. बरसातमध्ये त्याने बादलची मुख्य भुमिका निभावली होती. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. या चित्रपटात त्याला एक स्टंट करायचा होता. दरम्यान त्याला खुप गंभीर दुखापतंही झाली होती , इतकंच नाही,तर त्यामुळे त्याच्या पायात राॅड देखील टाकावा लागला, आणि तो राॅड आजुनही त्याच्या पायात आहे.

बरसातमधील या स्टंटबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला,”बरसात या माझ्या पहिल्या चित्रपटातील माझा इंट्रोडक्शन सीन जबरदस्त व्हावा यासाठी सगळेच प्रयत्न करत होते. ते माझं पहिलंच शुट होतं. तेव्हा आम्ही इंग्लंडमधल्या एका तुरुंगात होतो. माझा हा इट्रोडक्शन सीन शुट करतानाच मी एका घोड्याला धडकलो. ती धडक इतकी विचित्र होती की त्यामुळे माझा पाय मोडला आणि माझ्या पायात राॅड टाकावा लागला. तो राॅड आजही माझ्या पायात आहे.”
तो पुढे असंही म्हणाला की, ” तो पाय बरा झाला नाही म्हणुन मला अजुन एक सर्जरी करावी लागली. तेव्हा कुठे तो पाय बरा झाला. ”

पदार्पणावेळीच असा अपघात होऊनही बाॅबी देओल जवळपास 25 वर्षांपासुन या इंडस्ट्रीत टिकुन आहे. सध्या चर्चेत असणाऱ्या ऍनिमल चित्रपटात त्याने केलेल्या खलनायकाच्या भुमिकेचं चाहत्यांकडुन खुप कौतुक केलं जातंय. परंतु आता असंही म्हणलं जात आहे की या चित्रपटामुळे बाॅबीच्या अभिनय क्षेत्रातील बुडणाऱ्या करियरला आधार मिळाला आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा