कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. प्रत्येक दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. असाच बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही असे म्हणू शकता की, कोरोना व्हायरसचा शोध 1997 मध्येच लागला होता. एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत, ऐश्वर्या रायची स्वॅब टेस्ट देखील घेतली होती.
बॉबी देओलने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. सोबतच नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच एका सीनमध्ये तो मास्क लावून क्वारंटाईन बाबतीत सांगताना दिसत आहे. सोबतच आणखी एका क्लिपमध्ये तो हात धुवताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर सगळेजण कमेंट करताना दिसत आहेत.
बॉबी देओलच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटचा ‘आश्रम’ मध्ये निदर्शनास आला होता. यामध्ये त्याने एका बाबाचे पात्र निभावले होते. त्याच्या या पात्राने सगळ्यांचे मन जिंकले होते.
याशिवाय त्याने ‘लव हॉस्टेल’ आणि ‘केस ऑफ 83’ या सीरिजमध्ये काम केले आहे. त्याच्या या सगळ्या सीरिजमधील अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली होती. तो लवकरच त्याच्या ‘ऍनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा