Saturday, July 6, 2024

“माझ्या मुलांनाही प्रश्न पडला होता की, आपले पप्पा घरी का असतात?” बॉबी देओलने शेअर केला वाईट काळातील किस्सा

आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात घर केलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे बॉबी देओल. त्याने इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता त्याच्या फिल्मी करिअरने बरीच मोठी मजल मारली आहे. 90 च्या दशकामध्ये त्याने ‘बरसात’, ‘गुप्त’, ‘सैनिक’ यांसारखे चित्रपट करून नाव कमावले आहे.

यानंतर त्याने अनेक गंभीर पात्र निभावून चाहत्यांचे मनोरंजन केले. अनेक सुपरहिट चित्रपटांनंतरही मागच्या 2- 3 वर्षात त्याला त्याच्या करिअरमध्ये अनेत अडथळ्यांचा सामना करावा. परंतु ‘हाऊसफुल 4’ नंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप एनर्जीने कमबॅक केले. या चित्रपटाने जवळपास 200 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर त्याने ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सीरिजमध्ये काम केले. या वेब सीरिजने त्याचे आयुष्य बदलून टाकले. यातील सर्वोत्कृष्ट अभिनयामुळे त्याला ‘दादासाहेब फाळके’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. एका मुलाखतीत त्याने आपल्या करिअरमध्ये आलेले चढ-उतार आणि आता मिळालेले यश या बाबत खुलासा केला आहे.

‘दादासाहेब फाळके’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बॉबी देओलने सांगितले की, “हे सगळं यश मी माझ्या चाहत्यांमुळे बघू शकतोय, त्यांच्याशिवाय हे यश मिळणे अशक्य होते. त्यांनी माझी ‘आश्रम’ या वेब सीरिजमधील मेहनत पहिली. मला असं वाटत की, माझ्या कामात मी विविधता दाखवतो. त्यामुळे संपूर्ण जगाने आश्रम या वेब सीरिजला पाहिले आहे. मला कधीच वाटले नव्हते की, मला हा पुरस्कार मिळेल. माझी फक्त एवढीच इच्छा होती की, सगळ्यांना माझे काम आवडावे, आणि पुढे जाऊनही मला अजून चांगले काम करायचे आहे. मला कोणता पुरस्कार मिळो अथवा न मिळो परंतु मला सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.”

त्यानंतर बॉबीने सांगितले की, “माझ्या आयुष्यातील तो टर्निंग पॉईंट होता, जेव्हा माझ्याकडे कोणतेच काम नव्हते. मला असे पाहून माझी मुलं देखील हैराण झाली होती, त्यांना नेहमी हा प्रश्न पडत असे की, आपले पप्पा नेहमी घरातच का असतात. आणि हा तोच क्षण होता जेव्हा मला माझे आयुष्य खूप सिरीलासली घ्यायची गरज होती.”

बॉबी म्हणतो की, “या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाला मला सांगावेसे वाटते की, या क्षेत्रात येणे खूप सोपे आहे, परंतु आपली जागा टिकवणे खूप अवघड आहे. परंतु तुम्हाला खूप संयमाने वागण्याची गरज असते. तुम्ही त्या क्षणी हार नाही मानली पाहिजे. आत्मविश्वासने काम केले पाहिजे. असे केल्याने नक्कीच तुम्हाला यश मिळेल.”

शेवटी त्याने असे सांगितले की, “हार आणि जीत हा आपल्या आयुष्याचा एक भाग असतो. पण मी आता हा निर्णय घेतलाय की, मी इथून पुढे हार नाही मानणार. जेवढे चांगले काम करू शकतो तेवढे चांगले काम करणार.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये मैं हू, ये मेरा घर है और यहा…’, राखी सावंतने शेयर केला व्हिडिओ; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

-नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

-भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबलर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

हे देखील वाचा