Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अगं बाई!! ‘या’ अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलीय स्त्रीची भूमिका; ‘भाईजान’चाही समावेश

असे म्हटले जाते की जेव्हा भारतात चित्रपटाची सुरुवात झाली, त्यावेळी स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नसे. ज्यामुळे पुरुषच स्त्रियांच्या भूमिका निभावत असत. कलाकारांनी त्यांच्या पात्रात काहीतरी नवीन आणि वेगळे दाखविणे हे मोठे आव्हान असते. आपल्या चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्त्रियाच्या भूमिकेत अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी केवळ स्त्रियांची भूमिकाच बजावली नाही, तर प्रेक्षकांकडून प्रशंसाही मिळवली.

शम्मी कपूर
पडद्यावर स्त्रीची भूमिका साकारणे हे बॉलिवूडमध्ये काही नवे नाही. या यादीत पहिले नाव ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचे आहे. त्याकाळी, शम्मी यांनी स्त्री बनून प्रेक्षकांची मने जिंकली होती. 1963 च्या ‘ब्लफ-मास्टर’ या चित्रपटात शम्मी कपूर एका मुलीच्या भूमिकेत दिसले होते.

गोविंदा
अभिनेता गोविंदा कोणतेही पात्र अगदी उत्तमरीत्या साकारतो. त्याच्याकडून काहीही करून घ्या, तो कधीच चाहत्यांना निराश करत नाही. गोविंदानेही रुपेरी पडद्यावर स्त्रीचे पात्र साकारले आहे. गोविंदाच्या चित्रपटांत असे बरेच सीन आहेत, ज्यात तो लेडीज गेटअपमध्ये दिसला आहे. यातील काही चित्रपटांमध्ये तो कॉमेडी करताना दिसला. जसे की ‘राजा बाबू’, ‘आंटी नंबर वन’ या चित्रपटामध्ये तो विनोदी भूमिका साकारताना दिसला आहे. गोविंदा जेव्हा जेव्हा महिलांच्या भूमिकेत पडद्यावर दिसला, तेव्हा तेव्हा त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप पसंत केले गेले.

आमिर खान
‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खाननेही पडद्यावर एकदा महिलेची भूमिका साकारली आहे. ‘बाजी’ चित्रपटाच्या ‘डोले डोले दिल’ गाण्यात आमिर एका मुलीच्या लूकमध्ये नाचताना दिसला होता, तर त्याचवेळी टाटा स्काय आणि कोका कोलाच्या जाहिरातींमध्येही तो स्त्रीच्या वेशात दिसला आहे.

सलमान खान
बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान देखील एका चित्रपटात मुलगी बनला आहे. ‘जान-ए-मन’ मध्ये त्याने थोड्यावेळासाठी महिलेचा गेटअप केला होता. या चित्रपटात सलमान खानसह अक्षय कुमार आणि प्रीति झिंटा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 2006 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

श्रेयस तळपदे
महिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याचाही समावेश आहे. श्रेयसने ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटामध्ये स्त्रीची भूमिका केली होती. त्याच्या गर्ल लूकसाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये भरभरुन टाळ्या वाजवल्या होत्या. प्रेक्षकांना त्याची भूमिका खूप आवडली होती. महिलेची भूमिका साकारताना अभिनेता म्हणाला होता, “स्त्री होणे ही एक कला आहे.”

कमल हासन
अभिनेता कमल हासनने ‘आंटी 420’ चित्रपटात एका महिलेची भूमिका साकारली होती. या भूमिकेबद्दल खूप कौतुक झाले आणि त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुरुवातीला कमवायचा फक्त ३५ रुपये, आज आहे १०० कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांचा दिग्दर्शक, वाचा संघर्षमय प्रवास

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-खऱ्या आयुष्यात अविवाहित असलेल्या ‘भाईजान’ने चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीसोबत केलंय सर्वाधिक वेळा लग्न, पाहा फिल्मी वेडिंग लिस्ट

हे देखील वाचा