Saturday, June 29, 2024

‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची पुष्टी, करीना कपूर व्हिडिओ शेअर करत म्हणाली, ‘मी सुट्टीवर गेले होते अन्…’

बॉलीवूडच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘3 इडियट्स‘. राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्डच तोडले नाही, तर थेट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. अशात आता ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलच्या बातमीने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. होय… काही वेळापूर्वी, करीना कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल बोलताना दिसत आहे. करीना कपूरने स्पष्ट शब्दात चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केलेली नाही, मात्र अभिनेत्रीच्या या बोलण्याने लोक ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची अटकळ बांधू लागले आहेत.

‘3 इडियट्स’ चित्रपटासंदर्भात करीना कपूर (kareena kapoor) हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री ‘3 इडियट्स’चा उल्लेख करताना दिसत आहे. ती तक्रार करत म्हणते की, “मी सुट्टीवर असतानाच मला या प्रेस कॉन्फरन्सविषयी समजलं. हे तिघे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, मला वाटतंय ते सीक्वलसाठी एकत्र आले आहेत, पण हे तिघेच का?, तिथे मी पण हवी ना. माझ्याशिवाय कसं शक्य आहे? मला वाटतं बोमन इराणीलासुद्धा याबद्दल काहीच माहीती नसावी. मी आत्ताच बोमन इरणी यांना याबाबत फाेन करते आणि विचारते नेमके काय सुरु आहे?”

काही दिवसांपूर्वी राजकुमार हिरानी यांनी मीडियाशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला होता की, ते ‘3 इडियट्स’चा सिक्वेल बनवणार आहेत. फ्रँचायझीबाबत त्यांनी सांगितले होते की, ‘लेखनाचे काम सुरू आहे. ते त्यांचे सहलेखक अभिजात जोशी यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, त्याच्या सीक्वलमध्ये कोणते कलाकार असतील, याबाबत दिग्दर्शकाने काेणतीही माहिती दिली नाही.’

‘3 इडियट्स’ हा चित्रपट 2009 साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये आमिर खान रँचो, आर माधवन, फरहान कुरेशी आणि शरमन जोशी राजू रस्तोगीच्या भूमिकेत दिसला होता. त्यावेळी, या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.(bolllywood actress kareena kapoor hints to 3 idiots sequel says aamir khan kept this a secret )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अभिषेक माझा गौरव’ अभिषेक बच्चनला ‘तो’ पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केले लेकाचे कौतुक

काय सांगता! उर्फी जावेदला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार? फोटो शेअर करत दिली हिंट

हे देखील वाचा