Saturday, March 2, 2024

काय सांगता! उर्फी जावेदला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार? फोटो शेअर करत दिली हिंट

मनोरंजनविश्वात उर्फी जावेद हे नाव उच्चारले तरी लगेच डोक्यात येतात विविध अतरंगी कपडे. तिच्याबद्दल बातमी वाचताना देखील लोकं आता हिने कोणत्या वास्तूचे कपडे केले असतील असाच विचार करतात. अतरंगी फॅशन आणि उर्फी हे जणू एकच शब्द झाले आहेत. ती नेहमीच मीडियामध्ये तुफान गाजत असते. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल देखील उर्फीने सतत सर्वच गीष्टी प्रामाणिकपणे मीडियामध्ये सांगितल्या आहेत. अगदी ती जर नवीन काही फॅशन करणार असेल तर आधीच त्याची हिंट तिच्या फॅन्सला देत असते. आता तर तिच्या आयुष्यात खूपच मोठे काहीतरी घडले आहे, ते ती सांगणार नाही असे होणारच नाही.

उर्फीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून आता उर्फीच्या वैयक्तिक आयुष्यात कोणाची तरी एन्ट्री झाल्याची शंका सर्वांना येत आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे फॅन्स आणि नेटकरी गोंधळून गेले आहे. या फोटोमधून तिने तिच्या रिलेशनशिपची हिंट सर्वांना दिली आहे. झाले असे की उर्फीने एक फोटो शेअर केला असून, त्यात लिहिले आहे की, “आणि तो हो म्हणाला’ सोबतच हार्ट ईमोजी देखील आहे. यानंतर तिने एक फोटो शेअर केला ज्यात लिहिले, ‘ये आपण करून दाखवले.’

आता उर्फीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या रिलेशनसंदर्भात विविध प्रश्नांचा पूर सोशल मीडियावर आला आहे. शिवाय तिच्या रिलेशनशिपबाबत देखील अनेक बातम्या आता पसरू लागल्या आहेत. सर्वानाच तिच्या बॉयफ्रेंडबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. मात्र अजूनही तिने कोणतीही अधिक महिती शेअर शेअर केली नसून, फॅन्स तिच्याकडे याबद्दल अजून माहिती आणि बॉयफ्रेंडच्या फोटो शेअर करण्याची विनंती करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

हे देखील वाचा