Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रेग्नेंसीदरम्यान वाढत्या वजनामुळे इलियानाची झाली ‘अशी’ अवस्था; म्हणाली, ‘डॉक्टरांकडे जाऊनही फायदा नाही…’

बाॅलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने एप्रिलमध्ये तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दररोज ती या खास क्षणांची फाेटाे तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही काळापूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला होता. मात्र, यामध्ये तिने त्याचा चेहेरा नीट दाखवला नाही. अशात आता शुक्रवारी इलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आस्क मी एनीथिंग सेशन घेतले, ज्यामध्ये तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित अनेक गुपिते उघडली.

या सेशनमध्ये जेव्हा इलियानाला (ileana dcruz)चाहत्यानी विचारले की, ‘प्रग्नेंसीदरम्यान वजन वाढण्याबद्दल तिला काय वाटते?’ तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिले की, “सुरुवातीला हा प्रश्न तिला त्रास देत असे परंतु आता तिला त्रास होत नाही.” इलियानाने असेही सांगितले की,” कधीकधी तिला बरे वाटत नाही, परंतु जे लोक तिच्यावर प्रेम करतात आणि तिला सपाेर्ट करतात ते तिला आठवण करून देत असतात की, ती स्वत: मध्ये एक छाेटा जीव तयार करत आहे.”

इलियानाने पुढे लिहिले, “मला वाटते जेव्हा तुम्ही मुलाला जन्म देत असता, तेव्हा बरेच लोक तुमच्या वजनावर कमेंट करतात. अशात जेव्हा तुम्ही तपासणीसाठी डॉक्टरकडे जाता तेव्हा त्याचा फायदा होत नाही आणि त्यांना प्रत्येक वेळी तुमचे वजन मोजावे लागते. त्यामुळे ते सतत तुमच्या मनात असते.”

Ileana D'Cruz
Photo Courtesy: Instagram/ileana_official

इलियाना पुढे म्हणाली, “मला एवढेच सांगायचे आहे की, गेल्या काही महिन्यांत माझ्या शरीरात झालेले बदल मला आवडलेत. हा एक अद्भुत, विलक्षण आणि सुंदर प्रवास आहे. त्यामुळे वजना बाबत काही फरक पडत नाही. आनंदी आणि निरोगी रहा, तुमच्या शरीराचे ऐका आणि योग्य वाटेल ते करा.”

Ileana D'Cruz
Photo Courtesy: Instagram/ileana_official

इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, पण तिने सुरुवातीपासूनच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगले आहे. तिने अलीकडेच तिच्या जोडीदाराचा अस्पष्ट फोटो शेअर करून तिच्या मुलाच्या वडिलांची झलक दाखवली हाेती.(Bollywodo actress ileana dcruz worried about weight gain during pregnancy shared her experience )

अधिक वाचा-
संताेष अन् साेनालीच्या ‘डेटभेट’ चित्रपटातील नव्या पाेस्टरनं वेधलं चाहत्याचे लक्ष, ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार चित्रपट
‘काय धाड नाय भरली तुला, लै जगनार हायस तू’, पाहा किरण माने असं कुणाबद्दल बोलले

हे देखील वाचा