बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खुलेपणाने कौतुक केले आहे. अभिनेता दिल्लीतील नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याने पंतप्रधानांचे कौतुक केले. आता या कार्यक्रमातील आमिरचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…
पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओ शो ‘मन की बात’चा 100वा भाग पूर्ण करणार आहे. या खास निमित्याने बुधवारी (दि.26 एप्रिल) दिल्लीत नॅशनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता. यामध्ये आमिर खान आणि रवीना टंडन यासारखे बाॅलिवूड सेलिब्रेटीही उपस्थित हाेते.
आमिर खानने कॉन्क्लेव्हमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान अभिनेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारण्यात आला. प्रतिक्रिया देताना आमिर खानने शोचे कौतुक केले आणि पंतप्रधानांचे पाऊल महत्त्वाचे असल्याचे म्हटले. आमिर खान म्हणाला, “मन की बातचा भारतातील लोकांवर खोलवर परिणाम झाला आहे. पंतप्रधानांनी केलेली ही अतिशय ऐतिहासिक गोष्ट आहे.”
‘मन की बात’ संदर्भात आमिर खानने पीटीआयशी संवाद साधताना पुढे सांगितले की, “हा संवादाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो देशाच्या नेत्याने केला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे, कल्पना करणे, सूचना देणे, नेतृत्व करणे.” … या सर्व गाेष्टींमुळे तुम्ही संवादाद्वारे नेतृत्व करता. तुम्ही तुमच्या लोकांना सांगता की, तुम्ही कुठे पाहत आहात, तुमची भविष्याबद्दलची दृष्टी काय आहे, तुम्ही त्याला कसे समर्थन देऊ इच्छिता. हे एक महत्त्वाचे संभाषण आहे. ”
#WATCH | 'Mann Ki Baat' has had a huge impact on the people of India, says Aamir Khan at "Mann Ki Baat@100" National Conclave in Delhi. pic.twitter.com/Jx7yUn7uOM
— ANI (@ANI) April 26, 2023
रेडिओ कार्यक्रमात मोदी फक्त आपल्या मनाचीच चर्चा करतात का, असा प्रश्नही आमिरला विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना, अभिनेता म्हणाला, “मला वाटते की, हा त्यांचा विशेषाधिकार आहे. कारण, ते असे करत आहे. देशभरातील लोकांशी संपर्क साधण्याची ही त्याची पद्धत आहे. मला वाटते की, हा एक अत्यंत आवश्यक उपक्रम आहे.” अशाप्रकारे अभिनेत्यााने आपले मत मांडले.(bollywood aamir khan praises pm narendra modi for mann ki baat at national conclave in delhi )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंधांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘ही’ जोडी तुटली, लवकरच घेणार घटस्फोट
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क