Monday, April 15, 2024

समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क

साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘शकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील समंथाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला असला तरी, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लाॅप झाला आहे. अशात अलीकडेच समंथाच्या संबधीत एक फाेटाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. खरे तर, अभिनेत्रीची 10वीची मार्कशीट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीला काेणत्या विषयात किती गुण मिळाले हे स्पष्ट दिसत आहे.

समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) नुकतेच तिची 10वी वर्गाची मार्कशीट व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे रिपोर्ट कार्ड रिट्विट करून स्वतः समंथाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. समंथाच्या या रिपोर्ट कार्डमधील तिचा गुण पाहून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच शालेय जीवनातही हुशार विद्यार्थी होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या रिपोर्ट कार्डमध्ये, समंथाला सर्व विषयांमध्ये 80पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे तुम्ही पाहू शकता, परंतु तिचे गणितातील गुण थक्क करणारे आहे. खर तर समंथाला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत.

समंथा रुथ प्रभू हिने तिचे व्हायरल रिपोर्ट कार्ड शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा हा पुन्हा व्हायरल झाला आहे…’ यावर साेशल मीडिया युजर्स सतत प्रतिक्रिया देत अभिनेत्रीला टॉपर म्हणून संबोधत आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीचा नुकताच ‘शकुंतलम’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ती लवकरच विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या रोमँटिक चित्रपटातही दिसणार आहे. केवळ समंथाच नाही तर तिचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. याशिवाय अभिनेत्री वरुण धवनसोबत ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.(bollywood actress samantha ruth prabhu 10th class report card goes viral know her all subjects numbers)

निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंत झेड सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार; म्हणाली, ‘कंगनाला भेटली मग मला…’

सोनाक्षी सिन्हा 27 मुलींच्या शोधात निघाली एकटीच, अंगावर काटा आणणारा ‘दहाड’चा ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा