Wednesday, July 3, 2024

अंडरवर्ल्डच्या भीतीने ‘या’ अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला होता रामराम, सुपरस्टार चिरंजीवीच्या चित्रपटातून केला होता साऊथ डेब्यू

बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. यामध्ये साक्षी शिवानंद हिच्या नावाचाही आवर्जुन उल्लेख केला जातो. तिने हिंदीशिवाय तिने तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. एक दिवस ती अंडरवर्ल्डच्या भीतीने अचानक ग्लॅमरच्या जगातून गायब झाली. तिने गुरुवारी (१५ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण साक्षीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

साक्षीचा जन्म १५ एप्रिल, १९७७ रोजी मुंबईत झाला होता. तिने ‘क्रोध’ चित्रपटात सुनील शेट्टीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘जंजीर’, ‘जनम कुंडली’, ‘पापा कहते हैं’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. साक्षीचे पदार्पण ‘जनम कुंडली’  या हिंदी चित्रपटातून झाले होते, पण तो चित्रपट अयशस्वी ठरला होता. पण तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

‘आपको पहले भी कहीं देखा है’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रियांशु चटर्जी दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले होते. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. हळूहळू साक्षीला लोकप्रियता मिळू लागली. पण तिने बॉलिवूडमध्ये अधिक नाव कमावण्याआधीच अंडरवर्ल्डबाबत ऐकून बॉलिवूड सोडले.

साक्षीने काही वर्षांपूर्वी मुलाखतीत सांगितले होते की, ‘अंडरवर्ल्डच्या भीतीने मी ग्लॅमरचे जग सोडले.’ ती म्हणाली होती की, ‘जेव्हा मला कळले की, मी ज्या चित्रपटात काम करणार आहे, तो अंडरवर्ल्डचा आहे. मला प्रत्येकाने सांगितले होते की, बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यात गहन संबंध आहेत. मी खूप घाबरले, आणि मग मी बॉलिवूड सोडून साऊथला गेले.’

साक्षी इतकी घाबरली की, निर्मात्यांचे पण फोन तिने उचलले नाहीत. तसेच तिने आपला नंबरही बदलला होता. नंतर समजले की, साक्षीने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. तिने कधीही बॉलिवूडकडे मागे वळून पाहिले नाही.

साक्षी शिवानंद आता दक्षिण चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती तिथल्या लोकप्रिय नायिकांपैकी एक आहे. तिचे आता लग्नही झाले आहे. साक्षीने चिरंजीवीच्या ‘मास्टर’ चित्रपटातून आपल्या साऊथ चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. तिने बर्‍याच दिवसांपासून दक्षिणेत चित्रपट केले नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

-एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

हे देखील वाचा