Monday, April 15, 2024

सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी, बॉलिवूडमध्ये येऊन आपले नशीब आजमावले आहे. एक नाही तर अनेक भूमिका साकारत त्यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्या भूमिका करताना खऱ्या अर्थांने त्यांनी त्यात जिवंतपणा आणला आहे. त्या कलाकारांमधील एक नाव म्हणजे मनोज वाजपेयी. त्यांचा एक काळ असा होता की, जो त्यांनी खूप गाजवला. प्रत्येक प्रकारच्या भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा घट्ट बनवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

खलनायकापासून ते कॉमेडी आणि गंभीर पात्रांपर्यंत मनोज वाजपेयी यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रविवारी (23 एप्रिल) मनोज आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज चित्रपटसृष्टीतील ते एक परिचित चेहरा असले तरी, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता.

मनोज बाजपेयी यांचा जन्म 23 एप्रिल, 1979 ला नरकटियागंजमधील बेलवा या छोट्याशा गावात झाला होता. त्यांचे वडील शेती करायचे, तर सुट्टीच्या दिवसात मनोज वाजपेयी आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असत. मनोज यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. त्यांनी आपले शालेय शिक्षण बेतिया जिल्ह्यातील राजा हायस्कूलमधून केले. यानंतर ते सत्यवती महाविद्यालय, रामजस महाविद्यालय आणि पुढे दिल्ली विद्यापीठात पदवीसाठी गेले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये चार वेळा नाकारल्यानंतर त्यांनी बॅरी जॉन ड्रामा स्कूलमधील बॅरी जॉनबरोबर थिएटर केले होते. बालपणीच त्यांनी आपल्या मनाशी ठरवले होते की, पुढे जाऊन अभिनेताच बनायचं आहे.

आधीपासूनच अभिनय करण्याची इच्छा असल्याचे, मनोज यांचे म्हणणे होते. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘जंजीर’ पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की, आता अभिनयाशिवाय इतर कोणतेही काम ते करणार नाहीत. त्यावेळी जेव्हा अभिनेता होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, तेव्हा स्वत: च्या गावात थिएटर नव्हते. मात्र, त्यांनी मनापासून विचार केला होता आणि त्यासाठी त्यांनी साहित्याचा आधार घेतला होता.

मनोज यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात दूरदर्शनवर प्रसारित होणार्‍या ‘स्वाभिमान’ या मालिकेतून केली होती. शेखर कपूर यांनी त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याची पहिली संधी दिली. 1994 मध्ये त्यांनी शेखर कपूर यांच्या ‘बँडिट क्वीन’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु त्यांना खरी ओळख राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ या चित्रपटाद्वारे मिळाली होती.

मनोज बाजपेयी यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांचा पहिला विवाह 1990 साली झाला होता. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी 2006 साली बॉलिवूड अभिनेत्री शबाना रझासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगीही झाली आहे आणि, आता दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत. शबानाला नेहा म्हणूनही ओळखले जाते.

‘सत्या’ आणि ‘शूल’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘पिंजर’ चित्रपटातील शानदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (विशेष ज्युरी) देखील मिळाला आहे.(birthday special manoj bajpayee film journey is not easy here how he become sardar khan of acting world)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा शाहरुख खान मनोज वाजपेयीला पहिल्यांदा घेऊन गेला होता डिस्कोमध्ये; शेअर करायचे सिगारेट अन् बिडी
‘कसौटी जिंदगी की’ फेम एरिका फर्नांडिसने व्यक्त केली तिची व्यथा; म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये टीव्ही अभिनेत्रींसोबत…’

हे देखील वाचा