Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड आमिरने गायले त्याचे सुपरहीट गाणे, कार्तिकसाेबत केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडिओ

आमिरने गायले त्याचे सुपरहीट गाणे, कार्तिकसाेबत केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता आमिर खान सतत काेणत्या कारणाने चर्चेत असताे. ताे अलीकडेच एका लग्नात दिसला होता जिथे त्याने त्याच्या चित्रपटातील आयकॉनिक गाणे गायले. यावेळी लाल सिंग चड्ढा स्टारसाेबत कार्तिक आर्यनही हाेता, दाेघेही एका लग्नाच्या निमित्ताने भोपाळला पोहोचले. यादरम्यान लग्नात आमिरने ‘राजा हिंदुस्तानी‘ मधील ‘आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बन के’ हे आयकॉनिक गाणे गाऊन सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्यासोबत कार्तिक आर्यनही मंचावर उपस्थित होता.

लग्नात आमिर खान (aamir khan) काळ्या रंगाच्या शेरवानी आणि राखाडी रंगाच्या केसात प्रचंड स्मार्ट दिसत हाेता. त्याचवेळी कार्तिक आर्यनही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.

आमिर आणि कार्तिकने ‘तुने मारी एंट्री’वर केला जाेरदार डान्स
दुसर्‍या व्हिडिओमध्ये, आमिर आणि कार्तिक ‘गुंडे’ चित्रपटातील ‘तुने मारी एंट्री’ या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले. यावेळी दोघांच्या डान्सने उपस्थितांची लक्ष वेधले. तिथे उपस्थित सर्वांनी या दाेघांच्या डान्सचा पुरेपूर आनंद घेतला.

यादरम्यान, आमिर खान आणि कार्तिक आर्यन व्यतिरिक्त किरण राव, पंजाबी गायक जसबीर जस्सी, काँग्रेस सदस्य सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील उपस्थित हाेते.

आमिर खानने अभिनयातून घेतला ब्रेक
अभिनेत्याने अभिनयातून ब्रेक घेतला असला तरीह तो चित्रपटांशी जाेडलेला आहे. ताे सध्या 2008 च्या स्पॅनिश चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये व्यस्त आहे, ज्याचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना करणार आहेत. याआधी आमिर या चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण ‘धूम 3’ फेम अभिनेत्याने ताे या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे उघड केले आहे.(bollywood actor aamir khan and kartik aaryan dance fiercely at the wedding mr perfectionist robbed the party by singing a song)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी

‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले टीझरचे अनावरण

हे देखील वाचा