Thursday, March 28, 2024

मुलाचा ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप, पण वडिलांचा ‘ब्रह्मास्त्र’ हिट, नागार्जुना म्हणाले, ‘हा कटू क्षण…’

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या तब्बल 10 वर्षांच्या मेहनतीचं फळ म्हणजे ‘ब्रह्मास्त्र‘ होय. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हा यावर्षीचा सर्वात बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक होता. चाहते अनेक वर्षांपासून या सिनेमाची वाट पाहत होते. मात्र, एकदाचा हा सिनेमा 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनीही आनंदाने ‘झाला बाबा एकदाचा रिलीज’ म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला. अनेक टीका आणि बॉयकॉट ट्रेंडचा सामना करूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. या सिनेमात साऊथ सुपरस्टार नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अशात त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या यशासोबतच आपल्या मुलाचा पहिला हिंदी सिनेमा आपटण्यावरही चर्चा केली.

नागार्जुन (Nagarjuna) यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याने ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले. हा सिनेमा मागील महिन्यात म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’ या सिनेमाचा अधिकृत रिमेक होता. या सिनेमात आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र, नेटकऱ्यांनी सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आणि बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जोरात आपटला. अशात ‘ब्रह्मास्त्र’च्या यशावर नागार्जुन यांनी त्यांच्या मुलाचा उल्लेख केला आहे.

मुलाचा सिनेमा फ्लॉप होण्यावर काय म्हणाले नागार्जुन?
‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा फ्लॉप आणि ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा यशस्वी होण्यावर नागार्जुन यांना त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, “हा एक कटू क्षण आहे. या चित्रपटाने चांगली कामगिरी करायला हवी होती, परंतु हे होत राहते. हा आमच्यासाठी एक धडा आहे. सिनेमाच्या भवितव्यात काहीही लिहिले असो, पण आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उत्साही असतो. सिनेमा प्रदर्शित होताना आम्ही सर्वजण भेटतो, एकत्र जेवण करतो आणि त्या सिनेमाबद्दल बोलतो. हा कटू क्षण दरवर्षी येतो.”

बॉक्स ऑफिसवर धमाल करतोय ‘ब्रह्मास्त्र’
बॉक्स ऑफिस स्टेशनवरून ‘ब्रह्मास्त्र’ची गाडी सुसाट सुटली आहे. या सिनेमाच्या निर्माते- दिग्दर्शकांपासून ते संपूर्ण कास्टपर्यंत सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 6 दिवसात या सिनेमाने 150 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या सिनेमाच्या कास्टबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, 4 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला शाहरुख खान हादेखील या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विकीच्या वडिलांनी उंचावली खानदानाची मान! नॉर्वेत ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने झाला सन्मान
बॉयकॉट करुनही सुपरहीट, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बॉयकॉटची चिंता आम्हाला…’
पनवेलच्या फार्महाऊसची रेकी करून बिश्नोई गँगने केलेला बंदोबस्त; सलमानच्या हत्येसाठी काय होता ‘प्लॅन बी’

हे देखील वाचा