Sunday, December 3, 2023

गिप्पी ग्रेवालसोबत आमिर खानचा जबरा डान्स, व्हिडिओ वेधताेय लक्ष

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असून त्याने काही काळ ब्रेक घेतला आहे. अभिनेता आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. दरम्यान, आता अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालसोबत त्याच्याच ‘इंग्लिश बीट’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

अलीकडेच ‘कॅरी ऑन जट्टा 3’ या पंजाबी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये आमिर खानही या कार्यक्रमात पोहोचला होता. यानंतर अभिनेत्याने चित्रपटातील कलाकारांसाठी त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. जिथे सगळ्यांनी मिळून खूप मजा केली. हा व्हिडिओ देखील त्याच पार्टीचा आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर खानसह गिप्पी ग्रेवाल, सोनम बाजवा आणि इतर सदस्य सोफ्यावर बसून ‘इंग्लिश बीट’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. संपूर्ण टीम पार्टी सेलिब्रेट करत आहे. यादरम्यान आमिर खान देखील खूप टाळ्या वाजवून गाण्याचा आनंद घेत आहे आणि सोफ्यावर बसून अचानक नाचताना दिसत आहे.

यापूर्वी कपिल शर्माचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये त्याने ‘हंगामा है क्यूं बरपा, थोडी सी जो पी ली है’ हे गाणे गायले होते. यादरम्यान कपिलसाेबत त्याचा मित्र आणि त्याच्या शोचे संगीतकार दिनेश, कपिलची पत्नी गिनी चतरथ, कॉमेडियन किकू शारदा, अभिनेत्री कविता कौशिक, सोनम बाजवा, आमिर खान, गिप्पी ग्रेवाल या सारखे अनेक स्टार्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.(bollywood actor aamir khan dance with singer gippy grewal angreji beat song )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल छडी मैदान खडी’, रकुलच्या बिकिनी लूकने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल

अभिषेकसोबत लग्न न करता ‘ही’ अभिनेत्री बनली हाेती अमिताभ बच्चनची ‘सून’, संपुर्ण प्रकरण लगेच वाचा

हे देखील वाचा