एकेकाळी भोजपुरी, बॉलिवूड, तमिळ आणि मराठी इंडस्ट्रीला आपल्या अभिनयाने थक्क करणारी पाखी हेगडे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 7 जून रोजी जन्मलेली पाखी हेगडे आज कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. मूळची कर्नाटकची असलेल्या पाखीने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सिनेमातून केली, पण तिला यश मिळाले नाही. यानंतर तिने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि प्रसिद्धीची उंची गाठली. पाखीने आतापर्यंत बॉलीवूड चित्रपटांसोबतच तमिळ आणि मराठी इंडस्ट्रीतही तिच्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
पाखी (pakhi hegde) हिने ‘बेरी पिया’ या चित्रपटातून भोजपुरी चित्रपटांमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचवेळी ‘रिक्षावाला आय लव्ह यू’ या चित्रपटाने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. पाखी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. खरे तर, ‘द ग्रेट लीडर’ या चित्रपटात पाखी हेगडेच्या सासू – सासऱ्याच्या भूमिकेत जया आणि अमिताभ बच्चन होते. बिग बींच्या निवडक भोजपुरी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होता.
अभिनेत्रीचे निरहुआसाेबत जाेडले गेले नाव
पाखी हेगडेने निरहुआसोबत भोजपुरी चित्रपट ‘निरहुआ हिंदुस्तानी’मध्ये काम केले हाेते. अशात परदेशात प्रदर्शित झालेला निरहुआचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट हिट होताच पाखी हेगडे आणि निरहुआच्या अफेअरच्या चर्चेलाही जोर आला. चाहत्यांनी असा दावाही केला की, पाखी हेगडेने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर निरहुआशी लग्न केले. मात्र, या प्रकरणी दोघांनी कधीही मौन सोडले नाही.
View this post on Instagram
विशेष म्हणजे पाखी अनेकदा तिच्या वाढदिवसाच्या तारखेबद्दल चिंतेत असते. खरे तर, गुगलवर तिचा वाढदिवस 5 मार्चला दाखवला आहे, जाे चुकीचा आहे. ती म्हणते की, ‘मी गुगलवर माझ्या वाढदिवसाची तारीख दुरुस्त करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. आता चाहत्यांनी मला 5 मार्चला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.’ (actress pakhi hegde bhojpuri films amitabh jaya bachchan daughter in law nirahua dinesh lal yadav unknown facts)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मैं होश तू नशा…’, प्रियदर्शनी इंदलकरची ‘ती’ पाेस्ट चर्चेत
‘लाल छडी मैदान खडी’, रकुलच्या बिकिनी लूकने साेशल मीडियावर केला कहर, फाेटाे व्हायरल