Monday, July 1, 2024

आमिर खानची लाडकी लेक झाली हाेती डिप्रेशनची शिकार; म्हणाली, ‘संपूर्ण कुटुंबाला…’

इरा खान बॉलिवूडपासून दूर असली तरी अनेकदा पॅपराझी तिला आपल्या कॅमेऱ्यात स्पाॅट करतात. इराची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. मात्र, आयुष्यात खूप आनंदी असलेली इरा ऐकेकाळी डिप्रेशनची शिकारही झाली होती. काही वर्षांपूर्वी इराने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे याचा खुलासा केला होता. यानंतर तिचे वडील आमिर खान यांनी तिला साथ दिली. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अलीकडेच इरा खान (ira khan ) हिने मानसिक आरोग्यासाठी मदत म्हणून अगस्तू फाउंडेशन सुरू केले आहे. एका मुलाखतीत इराने खुलासा केला की, ‘आमिर आणि तिची आई रीना दत्ता फाउंडेशनच्या सल्लागार बाेर्डमध्ये आहेत आणि त्यांना योग्य निधी मिळेपर्यंत त्यांनी ते स्थापन करण्यास मदत केली.

जेव्हा इराला तिच्या डिप्रेशनच्या काळाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने आपला अनुभवाबद्दल विचित्र वागण्यात बदल सांगितले. इरा म्हणाली, ‘बराच वेळ रडणे, उदास वाटणे आणि अन्न न खाणे, काहीतरी चुकतंय’, असे वाटत हाेते. रीना दत्ता आणि आमिर खान यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला हाेता, ज्यामुळे या घटस्फोटाचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. तरीही इराला वाटत होतं की, काहीतरी चुकतं आहे. त्यानंतर त्यांनी नेदरलँडमधून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. इरा म्हणाली होती की, ‘तिची आई रीनाने तिला सांगितले होते की, तिला जगायचे नाही, त्यामुळे मी दिवसभर झोपत हाेते जेणेकरून मला एका दिवसात जगण्यासाठी कमी तास मिळतील.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तिच्या प्रवासाबद्दल बोलताना इरा म्हणाली की, ‘ती अजूनही औषधे घेत आहे, आणि तिला कधीकधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.’ इराने तिच्या प्रवासाबद्दल पुढे सांगितले की, ‘दर 8 ते 10 महिन्यांनी माझ्या आयुष्यात एक मोठी समस्या येते. हे सामान्य आहे. हे समजायला मला थोडा वेळ लागताे, पण माझ्या कुटुंबात मानसिक आरोग्याचे विकार चालतात.’ असे इराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.(bollywood actor aamir khan daughter ira khan has become a victim of depression said her whole family has this disorder )

अधिक वाचा-
श्वेता तिवारीच्या काळ्या साडीतील घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
साडीचा नखरा…अभिनेत्री आर्या आंबेकरचा पारंपरिक साज

हे देखील वाचा