Thursday, April 18, 2024

करिश्मा कपूरने 25 वर्षांपूर्वी आमिर खानसोबत दिला होता जबरदस्त किसिंग सीन, थरथर कापत होती अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर अभिनित ‘राजा हिंदुस्तानी‘ हा एक जबरदस्त सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटाची तगडी पटकथा, अभिनय, मधुर संगीत आणि वेशभूषा एवढी अप्रतिम होती की, चित्रपटाला 26 वर्षे उलटून गेली, तरी या चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. अशात आज रविवारी (25 जुन)ला अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया या चित्रपटातील किसिंग  सीनबद्दल रंजक किस्सा…

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी 1996 मध्ये ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट बनवण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ऐश्वर्या रायला या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून ऑफर दिली. जमले नाही, तर जुही चावलाला ऑफर दिली, पण काही कारणास्तव जुहीने नकार दिल्यानंतर पूजा भट्टला ऑफर दिली. पूजानेही काही कारणास्तव हा चित्रपट करण्यास नकार दिला, त्यामुळे चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमिर खानने धर्मेश यांना अशा अभिनेत्रीला साईन करण्याचा सल्ला दिला, जिच्यासोबत त्याने यापूर्वी चित्रपट केला नाही. अशाप्रकारे हा चित्रपट करिश्मा कपूरला मिळाला.

धर्मेश दर्शन यांनीही विचार केला नसेल की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर करिश्माचा करिश्मा इतका असेल. या चित्रपटातील करिश्माचा लूक तर अप्रतिम होताच, पण तिची स्टाईलही जबरदस्त होती. जी त्या काळात मुलींमध्ये फॅशन स्टेटमेंट बनली होती. मनीष मल्होत्रा यांनी या चित्रपटाला 26 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचा उल्लेख केला आहे. चित्रपटाशी संबंधित आठवणींना उजाळा देताना मनीष यांनी लिहिले आहे की, “करिश्मा पहिल्यांदाच 60 च्या दशकातील फिटेड कुर्ता आणि चुरीदारमध्ये सरळ केस आणि तपकिरी लेन्ससह नवीन लूकमध्ये दिसली होती. करिश्माच्या अभिनयासोबतच हा मेकओव्हरही प्रेक्षकांना खूप आवडला होता.”

इतकंच नाही, तर चित्रपटात करिश्मा आणि आमिरच्या किसिंग सीनची बरीच चर्चा झाली होती. करिश्माने एकदा एका मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित आठवणी शेअर केल्या आणि सांगितले की, “हा सीन चित्रित करण्यासाठी तीन दिवस लागले. फेब्रुवारी महिन्यात हा सीन उटीमध्ये संध्याकाळी 6-7 वाजता चित्रित करण्यात आला होता आणि थंडीमुळे मी थरथर कापत होते. हे कधी संपणार याचा विचार करत होते.” आमिर-करिश्माचा किसिंग सीन हा बॉलिवूडचा सर्वात लॉंग किसिंग सीन मानला जातो.

‘राजा हिंदुस्तानी’ला 26 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करिश्मानेही एक रहस्य शेअर केले आहे. तिच्या गाण्याची व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करताना करिश्माने लिहिले की, “’आये हो मेरी जिंदगी में’ हे माझ्या करिअरमधील आवडते गाणे आहे. एक तरुण मुलगी म्हणून मला भावनिकदृष्ट्या खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला. प्रेम आणि त्याग याविषयी बोलताना त्याचे बोल अतिशय सुंदर आहेत. ते नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असेल. राजा हिंदुस्तानीची 26 वर्षे साजरी करत आहे.”

‘राजा हिंदुस्तानी’ने खरोखरच भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘आये हो मेरी जिंदगी में’, ‘परदेसी-परदेसी’ या गाण्यांनी प्रेक्षकांना नाचायला भाग पाडले होते. हा रोमान्सने भरलेला चित्रपट 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हा अनेक आठवडे चित्रपटगृहे हाऊसफुल होती.(actress karishma kapoor and amir khan superhit film raja hindustani turns 25 years know some intresting story)

अधिक वाचा:
गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल
‘मिस यू..,’ म्हणत मुग्धा वैशंपायनने काढली प्रथमेश लघाटेची आठवण; म्हणाली…

हे देखील वाचा