Monday, July 1, 2024

आयरा खान हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत खेळली अनाेखा गेम, व्हिडिओ पाहून युजर्सने केलं ट्राेल

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याच्या लेकीचा साखरपूडा  झाल्यापासून तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत. इरा खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आयराने मागच्या वर्षीच नुपूर शिखरे साेबत साखरपुडा केला होते. नूपुर हा आयराचा जिम ट्रेनर आहे आणि दोघेही गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अशातच आयराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत दिसत आहे. काय आहे नेमके या व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

या व्हिडिओमध्ये आयरा आणि नुपूर एक अनोखा गेम खेळताना दिसत आहेत. जाे आजकाल  ट्रेंडिंगमध्ये आहे. या गेममध्ये नुपूर आणि आयराला काही प्रश्न विचारले जात आहेत आणि दोघी बोटाच्या इशाऱ्याने उत्तर देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपूर आणि आयरा खान यांना काही प्रश्न विचारले जात आहेत, जसे की प्रथम कोणी प्रपोज केले? आयरा आणि नुपूर यांच्यात कोण आळशी आहे? दोघांपैकी कोण हट्टी आहे? हा खेळ खूप मजेशीर असला तरी नुपूर तिच्या ब्लू डीप नेक टॉप ड्रेसमुळे ट्रोल झाली. तिने असे कपडे घातलेले व्हिडिओ शेअर करणे युजर्सना आवडले नाही.

तिच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तू नेहमी असे कपडे का घालतेस?’ त्याचवेळी काहीजण तिची खिल्लीही उडवत आहेत. आयरासोबतच तिचा हाेणार नवरा नुपूरलाही लोक ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीनतम व्हिडिओ आणि फोटो तिच्या अकाऊंटवर शेअर करते. आयराला 6 लाखांहून अधिक लोक इन्स्टावर फॉलो करतात, ज्यामुळे तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करताच इंटरनेटवर व्हायरल होतात.(bollywood actor aamir khan daughter ira khan seen playing unique game with her fiance nupur shikhare)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का?’, म्हणत महिला आयोगावर भडकल्या चित्रा वाघ

‘चित्रू, आपण दोघी लवकरच मैत्रिणी होऊ…’, उर्फी जावेदच्या पोस्टने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा