Saturday, June 29, 2024

काय सांगता! ट्विंकलला मारण्यासाठी आमिरने चक्क उचलला हाेता हात, वाचा संपुर्ण किस्सा

ट्विंकल खन्ना आता चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. कधी ती तिच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते, तर कधी ती इतर कारणांमुळे चर्चेत असते. या सगळ्यामध्ये ट्विंकल खन्नाची एका मुलाखत चर्चेत आली आहे, ज्यामध्ये तिने चित्रपटाच्या सेटवर आमिर खान कशाप्रकारे संतापला या संबंधीचा एक किस्सा सांगितला आहे. काय आहे नेमका प्रकरण चला जाणून घेऊया…

अभिनेत्री ट्विंकल खन्ना (twinkle khanna) हिच्यासाेबत ही घटना 22 वर्षांपूर्वी घडली होती. जेव्हा ती आमिर खानसोबत ‘मेला’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. अभिनेत्रीनं हा किस्सा 2015मध्ये ‘मिसेस फनीबोन्स’या पुस्ताकाच्या लाॅन्चदरम्यान सांगितला आहे. या बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये तिच्यासोबत करण जोहर आणि आमिर खानही उपस्थित होते. अशा परिस्थितीत जेव्हा अभिनेत्रीला आमिर खानसोबतच्या तिच्या अनुभवांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ‘चित्रपटाच्या सेटवर लक्ष न दिल्याने आमिर खानने रागाच्या भरात तिला चापट मारली होती.’

कार्यक्रमादरम्यान करणने आमिर खानला विचारले की, “ट्विंकलसोबत अभिनेत्री म्हणून काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?” यावर आमिरने एक जुना प्रसंग आठवला आणि सांगितले की, “मी एकदा ट्विंकलला सेटवर विचारले होते, ‘तू काय करते आहेस? तू असं का वागतेस? तुला तुझ्या कामाचीही पर्वा नाही.” तेव्हा ट्विंकल म्हणाली, ‘मी अक्षयच्या विचारात मग्न आहे.’ यादरम्यान ट्विंकल आमिरला थांबवत म्हणाली की,”आमिरने मला या प्रकरणावर चापट मारली होती’. आमिरने सांगितले की, “त्यावेळी ट्विंकलचा चेहरा पाहण्यासारखा होता.”

1995 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या ट्विंकलने ‘जान’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘जुल्मी’, ‘बादशाह’, ‘मेला’, या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, सध्या ती बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. (bollywood actor aamir khan once nearly slapped akshya kumar wife twinkle khanna on mela film set mr perfectionist revealed )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भज्जीची लव्हस्टोरी: मित्राने करुन दिली होती गीता बसराशी ओळख, मात्र तिने दिला होता लग्नाला नकार

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा