Friday, January 27, 2023

फ्लॉप अभिनेत्री ठरवूनही ट्विंकल खन्ना आहे कोट्याधीश, ‘या’ व्यवसायातून मिळतो तिला बक्कळ पैसा

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिचे लक्झरी लाइफ पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. ट्विंकलची फिल्मी कारकीर्द भलेही शानदार राहिली नसेल, पण मालमत्तेच्या बाबतीत अनेक अभिनेते-अभिनेत्रींना ती मागे टाकताना दिसते. ट्विंकल खन्ना आलिशान जीवन जगते. ट्विंकलने ‘बरसात’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. ‘बादशाह’, ‘मेला’ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही ट्विंकलला तिचा चित्रपटाचा आलेख उंचावता आला नाही. जेव्हा तिचे चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा तिने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

ट्विंकलला माहित होते की, तिच्या वडिलांकडे अमाप संपत्ती आहे. त्यामुळेच तिला अभिनय जगताला अलविदा करायला फारसा वेळ लागला नाही. लग्नानंतर ती अभिनय सोडून कौटुंबिक जीवनात व्यस्त झाली. अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर अक्षयने कारकिर्दीच्या आलेखात जबरदस्त झेप घेतली होती. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या अनेक दिवसांपासून सतत चित्रपट करत आहे, तर त्याच्या वयाचे आणि त्याच्यासोबतचे अनेक कलाकार घरी बसले आहेत. अक्षयच्या कारकिर्दीच्या यशात ट्विंकलचा मोठा हात असल्याचे मानले जाते. ट्विंकल आणि अक्षय कुमारही अफाट संपत्तीचे मालक आहेत.

राजेश यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाबद्दल बोलायचे झाले, तर काकांनी जितकी प्रसिद्धी मिळवली तितकीच संपत्तीही कमावली. राजेश यांच्या यशस्वी चित्रपटांनीही भरघोस कमाई केली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, काका जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. राजेश यांनी मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र केले होते. आपल्या मुलींवर जिवापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या राजेश यांनी आपल्या मालमत्तेचे दोन समान भाग केले होते. एक भाग ट्विंकल खन्ना आणि दुसरा रिंकी खन्नाला देण्यात आला. या मालमत्तेत काकांचा प्रसिद्ध बंगला ‘आशीर्वाद’चाही समावेश होता. मात्र, वाद झाल्याने दोन्ही मुलींनी ‘आशीर्वाद’ विकला.

ट्विंकल खन्ना भलेही अभिनय करत नसेल पण ती इंटिरियर डिझायनर, लेखिका आणि चित्रपट निर्माती झाली आहे. याशिवाय ती एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करते. श्रीमंत असण्यासोबतच ट्विंकल ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी खूप आलिशान जीवन जगते. (rajesh khanna daughter twinkle khanna live luxury life because his father left 10000 crore assets)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा दिग्दर्शकाने ट्विंकल खन्नाकडे केली होती ‘ही’ चुकीची मागणी; ‘या’ शब्दांत सुनावले तिने खडेबोल

ट्विंकल खन्नापासून ते साहिल खानपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींवर लागलाय फ्लॉप कलाकाराचा ठपका

हे देखील वाचा