Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

या चित्रपटानंतर अभय देओल लागले होते दारुच व्यसन; म्हणाला, ‘मी रोज मूर्खासारखा….’

आज (१५ मार्च) बॉलिवूडमधील प्रतिभासंपन्न अभिनेता अशी ओळख असलेला अभय देओल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तो बॉलिवूड निर्माते अजित सिंग यांचा मुलगा तर प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या आहे. चित्रपटांचीच पार्श्वभूमी लाभूनही अभयला या क्षेत्रात यश मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्याने 2005 मध्ये त्याने इम्तियाज अली यांच्या ‘सोचा ना था’ या सिनेमातून करिअरला सुरूवात केली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी त्याने अभय देओल आणि आयेशा टाकिया यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली.

पुढे 2009 साली अभय देओल अनुराग कश्यप यांच्या ‘देव डी’ या सिनेमात झळकला. या सिनेमाने मात्र त्याला मोठी ओळख दिली. या सिनेमातील त्याच्या कामाचे कौतुक देखील झाले. त्यानंतर अभयच्या आयुष्यात आला ब्लॉकबस्टर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा जोया अख्तरचा सिनेमा. या सिनेमातील कामासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

अभिनेता अभय (abhay deol) याने सांगितेल की, का त्याला प्रसिद्धीचा तिरस्कार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभय म्हणाला, “मी एका चित्रपट कुटुंबात वाढलाे असल्याने लहानपणीपासूनच प्रसिद्धी खूप जवळून पाहिली. मला ते आवडत नाही. कारण, ते तुमची गोपनीयता काढून घेते. तुमच्याबद्दल खूप काही लिहिले जाते. मला प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांचा खरोखरच तिरस्कार होता. कारण, मी लहानपणी माझ्या कुटुंबाविषयी खूप काही लिहिलेले पाहिले, ‘हे खरे आहे का, ते खरे आहे का?’ यामुळे मला राग यायचा. तुझे वडील चित्रपटात काम करतात, तुझे काका मोठे स्टार आहेत. साहजिकच जे काही लिहिले जायचे, ते मला शाळेत विचारायचे. मी कुटुंबाच्या आजूबाजूला अशी अनेक लोक पाहिले आहेत,जे मित्र नव्हते तर फायद्यासाठी होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

तो पुढे देव डीबद्दलही बोलला. अभयने सांगितले की, ‘देव डीची भूमिका केल्यानंतर एक वर्ष तो या पात्रातून बाहेर पडू शकला नाही.’ अभिनेत्याने पुढे सांगितले की, ‘त्या दिवसात तो न्यूयॉर्कमध्ये होता.’ अभय म्हणाला, “मी फाटक्या कपड्यात रस्त्यावर आलो नव्हतो,पण मी रोज मुर्खासारखा प्यायचो. मी काही खूप चांगले मित्र बनवले आहेत, त्यामुळे मला काही गोष्टी आठवतात.”

अभय देओल याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘जिंदगी ना मिलेगी दाेबारा’, ‘साेचा ना था’, ‘हॅपी भाग जायेगी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.(bollywood actor abhay deol talks about his personal life said i drank everyday like his character devd)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

दिग्दर्शक रोहित शेट्टी एकेकाळी या अभिनेत्रीच्या होता प्रेमात; नक्की कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्याच

हे देखील वाचा