बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी वेब सीरिज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज 2‘ साठी चर्चेत आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक पार्ट 2ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. ही वेब सीरिज 9 नोव्हेंबरपासून ऍमेझाॅन प्राईमवर प्रदर्शित हाेणार आहे. वेब सीरिजच्या प्रमाेशनवेळी अभिषेकला सभांषनादरम्यान त्याचा जवळचा मित्र शाहरुख खान याचा सल्ला आठवला, जो त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत दिला होता.
माध्यमांशी बाेलताना, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला त्याचे आव्हानात्मक पात्र आणि शाहरुख खानकडून मिळालेला विशेष सल्ला आठवला. तर झालं असं की, संभाषणादरम्यान अभिनेत्याला विचारण्यात आले की, “तो कुठला नवीन ‘स्पेशल’ कॅरेक्टर साकारण्याची वाट पाहत आहे का जी त्याला करायची इच्छा आहे?” या प्रश्नाला उत्तर देताना अभिषेक म्हणाला,”नाही.” तो पुढे म्हणाला की,” मी या बाबतीत खूप वाईट आहे, मी जे काही करत आहे, मी फक्त त्यावर लक्ष केंद्रित करताे. ऐवजी की, मला आणखी काय करता येईल.”
संभाषणा दरम्यान, अभिषेकला पुढे शाहरुख(shah rukh khan)कडून मिळालेला सल्ला आठवला आणि ताे म्हणाला, “करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख खानने मला ही संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितली होते. खरं तर, एके दिवशी आम्ही दोघे बोलत होतो, तेव्हा मी त्याला विचारले की, ‘तू खूप छान काम केले आहेस. तुझी अशी काेणती आवडती भूमिका आहे, जी तुला साकारायला आवडेल?”
या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने त्याला सांगितले की, “मी आतापर्यंत जे काही काम आणि भूमिका केल्या आहेत. त्या एक अभिनेता म्हणून कायम स्मरणात राहील. तुम्ही एक अभिनेता आहात त्यामुळे स्वतःला विचारा आणि आत्मपरीक्षण करा, तुम्ही सध्या जे काही करत आहात ते तुमचे आवडते नसेल, तर तुम्ही ते का करत आहात? भविष्यात काय घडणार आहे यावर लक्ष केंद्रित करू नका. फक्त तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करा आणि त्यात तुमचे 100% द्या.” असा सल्ला शाहरूखने अभिषेकला दिल्याचे अभिनेत्याने संभाषनादरम्यान सांगितले. (bollywood actor abhishek bachchan shares career advice from actor shah rukh khan during breathe into the shadows 2 promotion event)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलियाची स्टाईल देश-विदेशातही हिट; मॉडेल्सने गंगूबाई लूकमध्ये केलं रॅम्पवॉक
रंगबेरंगी साडीत क्रितीच्या दिलखेचक अदा