Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड ‘ब्रेथ: इनटू द शॅडोज’च्या टीकेवर अभिषेकने तोडले मौन; म्हणाला, ‘मानसिक आरोग्याबाबत आम्ही…’

‘ब्रेथ: इनटू द शॅडोज’च्या टीकेवर अभिषेकने तोडले मौन; म्हणाला, ‘मानसिक आरोग्याबाबत आम्ही…’

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलागा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘ब्रेथ: इनटू द शॅडोज‘ या वेबसिरीजचा दुसरा सीझन आला आहे. या शोमध्ये अभिषेक डॉ. अविनाश सबरवाल यांच्या भूमिकेत दिसत आहे. तो एका विकाराने त्रस्त आहे आणि त्यामुळेच तो खून करत आहे. वेब सिरीजमध्ये मानसिक आरोग्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याची टीका अलीकडे होत होती. यावर अभिषेकने मौन तोडले आणि त्यावर खुलेपणाने बोलला.

या वेब सिरीजच्या माध्यमातून डॉक्टरांचा संवेदनशील दृष्टिकोन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन मयंक शर्मा (Mayank Sharma) यांनी केले आहे. या क्राईम थ्रिलरमध्ये अमित साध (Amit Sadh), नित्या मेनन (Nithya Menen) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकतेच अभिषेकने माध्यमांशी बाेलताना या मालिकेवर संवाद साधला.

मानसिक आरोग्याबाबत होत असलेल्या टीकेवर अभिषेक बच्चन असहमत
अभिषेक म्हणतो, “मालिकेत मानसिक आरोग्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे याविषयी मी पूर्णपणे असहमत आहे. असे म्हणणाऱ्यांना सत्याची जाणीव नाही. या मालिकेच्या स्क्रिप्टवर डॉक्टरांनी काम केले आहे. मयंकचा मेहुणा स्वत: मानसोपचारतज्ज्ञ आहे, जो अशाच एका विकारावर संशोधन करत आहे. मानसिक आरोग्याबाबत संवेदनशील असणं ही आपल्या सर्वांची पहिली प्राथमिकता आहे. विशेषतः ज्यांना हा विकार आहे त्यांच्यासाठी.”

अभिषेक पुढे म्हणाला, “हा स्टाेरीचा आणि पात्राचा फक्त एक भाग आहे. त्याबद्दल लोकांना संवेदनशील करण्याचा त्यांचा हेतू नाही. अशी टीका चुकीची आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही गोष्टीत दोष शोधू शकत नाही. ही कथा दाखवण्यामागचा हेतू काय आहे, ते आधी समजून घ्यावे लागेल.”

अभिषेक बच्चन याचा ‘ब्रेथ: इनटू द शॅडोज’ ही वेबसीरिज 9 नाेव्हेंबरला प्रदर्शित झाली असून या वेबसीरिजला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Bollywood actor abhishek bachchan talks about mental health and breathe into the shadows)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रसिका सुनिल उर्फ शनायाच्या फोटोंनी सोशल मीडियाचे वाढवले तापमान, फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव
ब्रेकिंग! अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा