Monday, March 4, 2024

बिग बींना स्पर्धकाने विचारला असा काही प्रश्न की, अमिताभ बच्चन लाजून झाले लाल

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती 14‘च्या होस्टसाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांची खूप प्रशंसा होत आहे. त्याचा क्विझ शो प्रेक्षकांना खूप आवडतो. या शोमध्ये अमिताभ अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी रंजक खुलासे करून प्रेक्षकांचे मनाेरंजन करतात. असेच काहीसे या शोमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाले. यावेळी बिग बींनी पत्नी जया बच्चन यांच्या रोमँटिक मूडबद्दल खुलासा केला आहे.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अमिताभ (Amitabh Bachchan) यांनी एका स्पर्धकाला विचारले की, “तो स्वयंपाक करू शकतो का?” यावर स्पर्धक म्हणाला, “मी स्वयंपाकघरात गेलो तर माझी पत्नी मला स्वयंपाकघरातून बाहेर काढते कारण मला स्वयंपाकघरात प्रवेश नाही.”

स्पर्धकाचे उत्तर ऐकून अमिताभने विचारले की, “ती त्याच्यासाठी काय शिजवते?” तर स्पर्धकाने प्रतिक्रिया देत सांगितले की, “त्याची पत्नी त्याच्यासाठी सर्व काही बनवते. मला फक्त ते सांगायचे असते आणि ती माझी आवडती डिश बनवते.” स्पर्धकाने पुढे सांगितले की, “जेव्हा ते दोघे भांडतात तेव्हाही ती मला टिफिनमध्ये एक चिठ्ठी पाठवते, ज्यामध्ये लिहिले असते, माफीन फाॅर माय माफीन”, त्याची पत्नी त्याला प्रेमाने मफिन म्हणत असल्याचे त्याने सांगितले. स्पर्धकांचे प्रेमळ शब्द ऐकून अमिताभ हसायला लागतात.

व्हिडिओमध्ये पुढे, स्पर्धक अमिताभ बच्चन यांना विचारतो की, “जया बच्चन यांनीही त्यांना प्रेमाच्या नोट्स पाठवल्या आहेत का?” यावर अमिताभ म्हणाले की, “ती मला नोट्स लिहित नाही, पण जेव्हा जेव्हा ती रोमँटिक असते तेव्हा ती प्रेमाने मला आवडणाऱ्या गोष्टी बनवते आणि तिच्या हाताने मला खाऊ घालते.”

अमिताभ आणि जया यांचे लग्न 1973 मध्ये झाले होते. ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर दाेघांची पहिली भेट झाली हाेती. दोघांच्या लग्नाला 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. (tv actor amitabh bachchan revealed how is jaya bachchan showing love to him on kaun banega crorepati)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये केली 15 वर्षे पूर्ण, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांनी जिंकली चाहत्यांची मने

अभ्यासासाठी लढणाऱ्या मुलींना पाहून प्रियांका चोप्रा झाली भावूक; म्हणाली…

हे देखील वाचा