Monday, July 8, 2024

अनन्या अन् आदित्य राॅय कपूर रिलेशनशिपमध्ये? दाेघांचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे आजकाल त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहेत. माध्यमावर विश्वास ठेवला, तर आदित्य अनन्याला डेट करत आहे. अशात आता या जोडप्याने लॅक्मे फॅशन वीकमध्ये साेबत येऊन त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. या इव्हेंटमधील कपलचे अनेक फोटो सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या लूकने आणि केमिस्ट्रीने रॅम्पवर आग लावली आहे.

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या ग्रँड फिनालेमध्ये आदित्य-अनन्या डिझायनर मनीष मल्होत्रासाठी शोस्टॉपर बनले. फॅशन डिझायनरने त्याच्या इंस्टाग्रामवर या रूमर्ड कपलचा रॅम्प वॉकचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही अप्रतिम दिसत आहेत. फोटोंमध्ये दोघांनी कॅमेऱ्यासाठी सिझलिंग पोज दिल्या आहेत.

अनन्या पांडेने या कार्यक्रमासाठी स्ट्रॅपलेस बॉडीकॉन गाऊन परिधान केला हाेता. हा गाऊन अतिशय आलिशान पद्धतीने डिझाइन करण्यात आला होता. यासोबतच, कीहोल कट-आउट, ब्लॅक अँड व्हाइट चेकर्ड प्रिंट, टॅसल एम्बिलिशमेंट्सह हा रिस्क थाई-हाई स्लिट पुर्ण करण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनन्याने तिचा लूक कॉम्बॅट बूट्स, स्टेटमेंट इअररिंग्स आणि मिड-पार्टेड वेव्ही कर्ल्ससह पूर्ण केला, ज्यामुळे अभिनेत्री खूपच छान दिसत हाेती, तर आदित्य रॉय कपूरही त्याच्या लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत होता. या कार्यक्रमात त्याने काळ्या रंगाच्या सूटमध्ये रॅम्प वॉक केला. या जोडप्याला वाॅक करताना पाहून सर्वजण आनंदी झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, अफवा असलेल्या जोडप्याने या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिवाळी पार्टीपासून ते डिनर डेटपर्यंत हे कपल अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत.(bollywood actor aditya roy kapur with rumoured girl friend ananya panday walked the ramp together at the lakme fashion week)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध निर्माते प्रदीप उप्पूर यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा