Sunday, May 19, 2024

आदित्य रॉय कपूरला डेट करतेय क्रिती सेनन? करण जोहरनेही सांगून टाकलं, ‘मी तुम्हाला कोपऱ्यात…’

बॉलिवूड कलाकारांमधील डेटिंगचा विषय आता सामान्य झाला आहे. इथे दररोज नवीन नाती बनतात आणि तुटतात. तसेच, काही नावांची फक्त चर्चा होते. अशात आता इंडस्ट्रीला नवीन जोडपे मिळणार असल्याची बातमी आहे. मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य रॉय कपूर याचे नाव अनन्या पांडे हिच्याशी जोडले जात होते. मात्र, अनन्याने आदित्यला आपला मित्र सांगत नात्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. दुसरीकडे, आदित्यचे नाव अभिनेत्री क्रिती सेनन हिच्यासोबत जोडले गेले आहे. असा दावा केला जात आहे की, दोघेही एकमेकांना डेट करतायेत. यावर आता क्रितीने मौन सोडले आहे.

करण जोहर (Karan Johar) याचा चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’च्या आगामी एपिसोडमध्ये क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हजेरी लावणार आहेत. दोघेही पहिल्यांदाच या शोचा भाग बनणार आहेत. यादरम्यान क्रितीसमोर करण आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) याचा उल्लेख करताना दिसेल. खरं तर, अनेक कलाकारांनी आदित्यला फ्लर्ट करण्याच्या बाबतीत प्रो असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच करण क्रितीसमोर वारंवार आदित्यच्या नावाचा उल्लेख करेल. अशातच आता त्याने अभिनेत्रीला म्हटले की, त्याने एका पार्टीत तिला आदित्यसोबत एका कोपऱ्यात पाहिले होते.

करण जोहरच्या वक्तव्यानंतर क्रितीदेखील उत्तर देते. ती म्हणते की, “मी कोपऱ्यात कडलिंग करण्यासाठी जाऊ शकत नाही. हो, आम्ही एकमेकांशी बोलत होतो आणि तो खूपच मजेशीर व्यक्ती आहे. तो चांगला व्यक्ती आहे, आणि माझा विश्वास आहे की, आम्ही एकत्र चांगले दिसतो.” क्रितीने हे वक्तव्य करून स्पष्ट केले की, तिला आदित्य आवडतो. अशात ही ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीनही जोडी बनली, तर आश्चर्य वाटायला नको.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

क्रिती सेननसोबत या शोमध्ये टायगर श्रॉफदेखील झळकणार आहे. टायगर आणि क्रिती यांनी एकसोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘हिरोपंती’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा चांगलाच गाजला होता. नुकताच या सिनेमाचा सिक्वेलही प्रदर्शित झाला, पण तो कमाल दाखवण्यात अपयशी ठरला. आता दोघेही ‘गणपत’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा हा सिनेमा काय कमाल करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माय – बापानं काही शिकवलं नाही…’, अर्चना गाैतम अन् प्रियंका चाैधरीचे जाेरदार भांडण
प्रेयसीचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर स्वराचा राग आला उफाळून; ट्विट करत म्हणाली…

हे देखील वाचा