Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या ऐश्वर्याने सर्वांसमोर झुकून रजनीकांत यांना केला नमस्कार, पाहा व्हिडिओ

ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या ऐश्वर्याने सर्वांसमोर झुकून रजनीकांत यांना केला नमस्कार, पाहा व्हिडिओ

‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारखे दमदार बॉलिवूडला देणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (दि. 06 सप्टेंबर) रिलीज झालाय. या चित्रपटात ऐश्वर्या साऊथ अभिनेत्यांसाेबत दिसणार आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज हाेताच साेशल मीडियावर धुमाकूळ घातली. या चित्रपटाचा ग्रँड इव्हेंट चेन्नईमध्ये पार पडला. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरबराेबर म्युजिक देखील लाँच करण्यात आले. कार्यक्रमात साऊथचे प्रसिद्ध अभिनेते उपस्थित हाेते. त्याचबराेबर सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हेदेखील उपस्थित हाेते. या खास वेळी ऐश्वर्याने जे मंचावर केले, त्याने सर्वांची मने जिंकली. यादरम्यानचा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

‘पोन्नियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan) चित्रपटाच्या ट्रेलर रिलीझ इव्हेंटमध्ये रजनीकांत यांच्या उपस्थितीने ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) खूप आंनदी झाली. तिने या प्रसंगी सर्वांसमाेर रजनीकांत (Rajinikanth) यांचे पाया पडून नमस्कार केला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाेरदार व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताे की, खूप दिवसानंतर रजनीकांत यांना पाहून ऐश्वर्याला खूप आंनद झाला. तिने लगेच खाली झुकत सुपरस्टार रजनीकांत यांना नमस्कार केला.

ऐश्वर्या आणि रजनीकांत यांनी 2010 साली आलेल्या ‘राेबाेट’ चित्रपटात एकत्र काम केले हाेते. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली हाेती. 132 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 290 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग 2018मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बजेटहून अधिक रुपयांची कमाई केली होती.

दुसरीकडे, ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर या चित्रपटाची स्टाेरी 10व्या शतकातील चोल साम्राज्य यांच्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत आहे. तरीदेखील  चित्रपटाच्या त्यांच्या लूकवर खूप विवाद झाला हाेता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रिषभचा पत्ता कट! उर्वशी रौतेला झालीय ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात वेडी?

‘या’ अभिनेत्रीने बिकिनी घालून ट्रेनरसोबत केला जबरदस्त योगा; नेटकरीही म्हणाले, ‘उद्या घटस्फोट फिक्स’
शहनाज गिलने भावासाेबत घेतले ‘लालबागच्या राजा’चे दर्शन, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूने वेधले सगळ्यांचे लक्ष

हे देखील वाचा