Friday, March 29, 2024

ऐश्वर्या राय बच्चनच्या घरी पुन्हा पाळणा हलणार का? तिचा एअरपोर्ट लुक बघून चाहत्यांना आली शंका

अभिनेत्रींच्या आयुष्यात काय चाललय हे जाणून घ्यायची चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते. सोशल मीडियाने चाहत्याचं हे काम जरा जास्तच सोपं केलंय.  अभिनेत्रींच्या लग्नाआधी त्यांचं कुणाशी अफेयर आहे का याची माहिती चाहते खोदत असतात. लग्नं झालं की हनिमूनला कुठे गेले, तिथे काय केलं याकडे चाहत्यांचे कान आणि डोळे लागलेले असतात. आणि लग्नानंतर वर्ष उलटलं की अभिनेत्रींच्या प्रेग्नन्सीचे वेध नेटकरी किंवा त्यांच्या चाहत्यांना लागतात. थोडक्यात काय अभिनेत्रींच्या आयुष्यातील अपडेट त्यांना हवीच असते. त्यात जर सेलिब्रिटी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) असेल तर मग काय विचारूच नका.

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलची तर जादू होतीच पण या फेस्टिव्हलमधील रेड कार्पेटवरील अभिनेत्रीचे लुकही व्हायरल झाले. कान्स आणि ऐश्वर्या यांचं नातं कायमच लक्षवेधी आहे. त्यामुळे यंदाही ऐश्वर्या कान्समधील रेडकार्पेटवरील लुकने चर्चेत आली. यावेळी तिचा लुक काही नेटकऱ्यांकडून ट्रोल झाला तर नव्या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर नजरा खिळवून ठेवण्यात बाजी मारली. यावर्षी ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्याही कान्समध्ये सहभागी झाली होती. आराध्यानेही कान्स आई ऐश्वर्याइतकंच लक्ष वेधून घेतलं.

कान्सवरून  मुंबईत परतल्यानंतर ऐश्वर्या एअरपोर्ट लुकमध्ये फिल्मी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी तिच्यासोबत अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्याही होते. ऐश्वर्याचे फोटो बघणं ही तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच एक ट्रीट असते, पण यावेळी ऐश्वर्याचा एअरपोर्ट लुक चाहत्यांच्या मनात प्रश्नांची मालिकाच सुरू करणारा होता. ब्लॅक टीशर्ट , ब्ल्यू डेनिम आणि श्रग अशा लुकमध्ये ऐश्वर्या नेहमीइतकीच सुंदर दिसत होती. पण राहून राहून ती श्रगने तिचं पोट कव्हर करताना दिसत होती. चाहत्यांच्या नजरेने नेमकी हिच गोष्ट हेरली. फार बारकाईने पाहिल्यानंतर ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची शंका चाहत्यांना आली.

एअरपोर्ट लुकचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरवर व्हायरल होताच चाहत्यांकडून आलेल्या कमेंटमध्ये अनेकांची हाच प्रश्न विचारला आहे की ऐश्वर्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का? खरंतर सध्या मुंबईत इतका उकाडा असताना ऐश्वर्याने घातलेला ड्रेस आणि सतत पोट झाकण्याचा सुरू असलेला प्रयत्न व्हिडिओमध्ये दिसत असल्याने चाहत्यांच्या मनात शंका आल्या आहेत.

२००७ साली अभिषेक आणि ऐश्वर्या यांची धुमधडाक्यात लग्नं झालं. २०११ साली आराध्याचा जन्म झाला आणि आता ती १० वर्षांची आहे. त्यामुळे ऐेश्वर्याने दुसरा चान्स घेतला असेल का अशा उत्सुकतांना चाहत्यांच्या मनात उकळी फुटायला लागली आहे. अर्थात ऐश्वर्या प्रेग्नंट आहे की नाही याला दुजोरा देणारी बातमी पुढे आलेली नसल्याने हे केवळ चाहत्यांच्या मनातील प्रश्न असल्याचं सध्यातरी दिसतंय.

हे देखील वाचा