Wednesday, June 26, 2024

चाहत्याने अजय देवगणसोबत केले गैरवर्तन, संतापलेल्या अभिनेत्याला उचलावे लागले ‘हे’ पाऊल, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने 3 एप्रिल रोजी त्याचा 54 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान मुंबईतील अभिनेत्याच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते जमले होते. त्याचवेळी अजयही काही काळ चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, यादरम्यान एका चाहत्याने असे कृत्य केले, ज्यानंतर अभिनेताही नाराज झाला. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

खरंतर, रविवारी अजय देवगणच्या घराबाहेर त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुटून पडले होते. जेव्हा अभिनेता घराबाहेर पडला तेव्हा त्याला समोर पाहून चाहतेही खूप उत्साहित झाले. यानंतर चाहत्यांनी अजयसोबत सेल्फीही काढले. मात्र, यावेळी एका चाहत्याने अजय देवगणचा हात पकडला, त्यानंतर अभिनेता संतापला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने अजय देवगणचा हात पकडला तेव्हा त्याने लगेचच रागाच्या भरात त्याचा हात सोडला. अशा परिस्थितीतही रागावर मात करत तो पुढे गेला. अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

या व्हिडिओवर अनेकांनी अजयला त्याच्या वागण्यावरून ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, “यांना कधीच कळणार नाही एका चाहत्यांचा उत्साह.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “भोला बॉयकॉट करा…डोकं ठिकाणावर येईल” अशाप्रकारे साेशल मीडिया युजर्स व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करून अभिनेत्याला ट्राेल करत आहे.

अजय देवगणच्या वर्क फ्रंटबाबत बाेलायचे झाले, तर अभिनेत्याचा ‘भोला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगणने केले आहे. अशातच अभिनेत्याचा ‘मैदान’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ‘भोला’सोबतच ‘मैदान’चा टीझरही रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.(bollywood actor ajay devgn birthday celebration video viral of angrily pull fans hand users trolled actore)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच भेटीत पल्लवीने विवेकला समजले होते गर्विष्ठ, मात्र पुढे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींमध्ये फुलली प्रेमकथा

हे देखील वाचा