Saturday, March 2, 2024

अजय देवगणच्या ३० वर्षाच्या मोठ्या कारकिर्दीत अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा

बॉलिवूडला नेहमीच अस्थिर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात अनेक लोकं जातात आणि येतात. सगळ्यांनाच मोठे यश मिळेल याची शाश्वती कोणालाच नसते. बॉलिवूडमध्ये अपयश मिळायला सुरूवात झाली की, लोकांना ते कलाकार लक्षात राहत नाही. मात्र असे देखील कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रतिभेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. बॉलिवूडमध्ये यशस्वी काही वर्ष पूर्ण केले तरी खूपच मोठी गोष्ट असते. मात्र याच क्षेत्रात असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीमधे अनेक दशकं गाजवली आहेत. यातलाच एक सुपरस्टार अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजयचा आज म्हणजे रविवारी (दि. 2 एप्रिल)ला वाढदिवस आहे. चला तर मग या निमित्त जाणून घेऊया अभिनेत्त्याची लव्ह लाईफ.

बॉलिवूडमधील सिंघम स्टार असलेल्या अजयने त्याच्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक लुक्सने सर्वांनाच त्याची दाखल घेण्यास भाग पडले. अजयने बॉलिवूडमध्ये त्याच्या ऍक्शनने आणि त्याच्या रफ अँड टफ लूकने त्याचे वेगळे आणि पक्के स्थान निर्माण केले. ‘फुल और कांटे’ सिनेमातून चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या अजयने त्याच्या व्यायसायिक आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत केली. त्याच्या ३० वर्षाच्या करिअरमध्ये त्याने अनेक चढ उतार पाहिले. त्याचे व्यावसायिक आयुष्य जसे गाजले तसे त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील तुफान गाजले. त्याच्या ३० वर्षाच्या करिअरमध्ये त्याचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्री ज्यांच्याशी अजयचे नाव जोडले गेले.

मनीषा कोईराला:
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मनीषा सध्या जरी कमी दिसत असली, तरी तिने ९० च्या दशकात तुफान लोकप्रियता मिळवली. मनीषा आणि अजयचे देखील नाव जोडले गेले. त्याचे प्रकरण खूप गाजले.

तब्बू :
प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी तब्बू देखील या यादीत सामील आहे. तब्बूने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तिने अजून फक्त अजय देवगणमुळेच लग्न केलेले नाही.

करिश्मा कपूर :
करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांचे नाते इंडस्ट्रीमध्ये तुफान गाजले. आजही त्यांच्या रिलेशनबाबत अनेक बातम्या समोर येतात. अजय आणि करिश्मा यांचे नाते लग्नापर्यंत गेले होते. मात्र मधेच माशी शिंकली आणि त्यांचे ब्रेकअप झाले.

रविना टंडन :
करिश्मा कपूर अजय देवगनच्या आयुष्यात येण्याआधी अजय आणि रविना नात्यात होते. मात्र अजयच्या आयुष्यात करिश्माची एन्ट्री झाली आणि त्याचे, रविनाचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर रवीनाने अजयवर अनेक गंभीर आरोप केले होते.

कंगना रनौत :
काही रिपोर्ट्सनुसार कंगना आणि अजयदेखील नात्यात होते. मात्र कधीही या दोघांकडून त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही माहितीसमोर आली नाही.

इलियाना डिक्रुझ :
मधल्या काही काळात इलियाना आणि अजय यांचे अफेयर असल्याच्या बातम्यांना मोठा जोर आला होता. त्या दोघांनीही या बातम्यांना निव्वळ अफवा असे सांगितले.

काजोल :
अजय आणि काजोल यांची पहिल्यांदा भेट ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि १९९९ साली त्यांनी लग्न केले. अजय आणि काजोल याना न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत.

अशाप्रकारे त्याच्या प्रेमप्रकरणांची सर्वत्र चर्चा चालू होती. (these rumoured love affairs of ajay devgn 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’

हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा