सुपरस्टार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नक्कीच काहीतरी पोस्ट करतो. नुकताच अक्षयने स्वतःचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओचे कॅप्शन खूपच मजेदार आहे, जे वाचून चाहते हसत आहेत.
अक्षयने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या छोट्या क्लिपमध्ये, सर्कसमधील एक माणूस मौत का कुआंमध्ये पराक्रम करत असल्याचे दिसून येते. तेव्हा त्याची पत्नी ट्विंकल खन्ना उत्साहाने अभिनेत्याला विचारते की, “याला काय म्हणतात.” त्यानंतर अक्षय पत्नीला सांगतो की,”यह मौत का कुआं है.” या व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काल माझ्या कुटुंबाला जुनी सर्कस दाखवायला गेलो होतो. माझ्या बायकोने विचारले की, ‘हा माणूस काय करतोय?’ मी तिला सांगू शकलो असतो की, याला ‘लग्न’ म्हणतात.” त्यापुढे त्यांनी हॅश टॅगमध्ये मौत का कुआं लिहिले आहे.
Got my family to watch the good old circus yesterday. Wife asked me what this act is called. I wish I could say ‘marriage’ ????#MautKaKuan pic.twitter.com/B2vNQ0Bum0
— Akshay Kumar (@akshaykumar) January 2, 2023
अक्षय कुमारचे हे मजेशीर कॅप्शन वाचून सर्वजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याचा हा व्हिडिओ रिट्विट करत आहेत. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी अक्षयने ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये ते इंग्रजी गाणे गाताना आणि मजेदार डान्स करताना दिसले हाेते.
अक्षय कुमारच्या वर्क फ्रंचबद्दल बाेलयचे झाले तर, ताे लवकरच पूजा एंटरटेनमेंटच्या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो अभियंता जसवंत सिंग गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा 1989 मध्ये राणीगंज येथील कोळसा खाण दुर्घटनेवर आधारित असेल, जिथे मुख्य अभियंत्याने आपले कौशल्य दाखवून खाणीत अडकलेल्या 65 लोकांचे प्राण वाचवले. टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित हा अनटायटल रिअल लाइफ रेस्क्यू ड्रामा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.(bollywood actor akshay kumar compared marriage to maut ka kuan watch funny video)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मृणाल ठाकूरच्या नवीन दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा, नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर
‘आम्ही एक पाऊल पुढे आलो आहोत…’, अभिनेत्री अश्विनी महांगडेने हाती घेतला नवीन वसा










