Wednesday, December 6, 2023

जेव्हा अक्षय कुमार- प्रियांका चोप्राचे होते सिरीयस अफेयर, ट्विंकल खन्नाने अभिनेत्याला दिली होती ‘ही’ शपथ

आपल्या हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे आहे, ‘कितने अजीब रिश्ते यहा पे‘. हे गाणे गीतकाराने चित्रपटसृष्टीतील नात्यांना समोर ठेऊनच लिहिले आहे की काय? असा प्रश्न बॉलिवूडमधील नात्यांच्या बातम्या ऐकून नक्कीच एखाद्याच्या मनात येईल. कारणही तसेच आहे. अनेक अभिनेत्रीची, अभिनेत्यांची नावे वेगवेगळ्या लोकांसोबत अगदी सहजतेने जोडली जातात. आता हे किती खरे असते आणि किती अफवा हे त्या कलाकारांनाच माहित. एका कलाकाराचे नाव अनेक व्यक्तींसोबत जोडले जाते. या जाळ्यातून लहानापासून ते मोठ्यांपर्यंत कोणतेच कलाकार वाचले नाहीये.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या देखील अनेक अभिनेत्रींसोबत अफेयरच्या चर्चा मीडियामध्ये रंगल्या होत्या. २००३ मध्ये जेव्हा अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनी पहिल्यांदा ‘अंदाज’ चित्रपटात एकत्र काम केले, तेव्हा त्यांच्या लिंकअप्सच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. प्रेक्षकांना देखील अक्षय आणि प्रियांका ही जोडी खूप आवडली. असे म्हटले जाते की, याच दरम्यान अक्षय आणि प्रियांका जवळ आले होते.

साल २००३ नंतर हे दोघं २००४ साली ‘ऐतराज’ या सिनेमात पुन्हा सोबत दिसले. याच काळात या दोघांचं अफेयरच्या चर्चाना उधाण आले होते. यावेळेस अक्षयच्या बायकोला म्हणजेच ट्विंकल खन्नाला या अफेयरबद्दल समजले. यानंतर अक्षय आणि ट्विंकल मध्ये खूप भांडण झाले. नंतर अक्षयला ट्विंकलने शपथ दिली होती की, तो पुढे प्रियांकासोबत कधीच काम करणार नाही. २००५ साली ‘वक्त : रेस अगेंस्ट टाइम’ या सिनेमानंतर ते दोघे पुन्हा कधीही सोबत दिसले नाही.

 

अक्षयला ‘आप की अदालत’मध्ये याबद्दल विचारण्यात देखील आले होते की, तो प्रियांकासोबत काम करणार का? यावर अक्षय म्हणाला होता की, “मला प्रियांकासोबत काम करायचे आहे, भविष्यात जर मला आणि प्रियंकाला सोबत काम करायची संधी मिळाली, तर मी नक्कीच तिच्यासोबत काम करेल.” प्रियांकाचे नाव देखील अक्षय कुमार, हरमन बावेजा,शाहिद कपूर, शाहरुख़ खान आदी कलाकारांसोबत जोडले गेले आहे. (twinkle khanna reaction on akshay kumar priyanka chopra affair)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी पत्नीच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही’ अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाबद्दल केला मोठा खुलासा

ट्विंकल खन्नाने शेअर केला आई डिंपल कपाडिया यांच्यासोबतचा बालपणीचा फोटो, चाहत्यांना विचारला अनोखा प्रश्न

हे देखील वाचा