Wednesday, June 26, 2024

कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ अन् जटाधारी अवतारात दिसला अक्षय, युजर्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

श्रावण महिना सुरू आहे. भोले बाबाच्या नावाचा जयघोष सर्वत्र होत आहे. दरम्यान, बॉलिवूडचा एक चित्रपटही जाेरदार चर्चेत आहे. ‘ओह माय गॉड 2‘ असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील अक्षय कुमारचा नवा लूक समोर आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

अक्षय कुमार (akshay kumar) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो भगवान शिवच्या रूपात दिसत आहे. अभिनेत्याचा लूक इतका जबरदस्त आहे की, युजर्स त्याचे कौतुक करत थकत नाहीत. यासोबतच या चित्रपटात सनातनची खिल्ली उडवू नये, असे आवाहनही युजर्स अभिनेत्याला करत आहे. नवीन लूकमध्ये अक्षय कुमार कपाळावर राख लावलेला, गळ्यात रुद्राक्ष जपमाळ घातलेला आणि जटाधारी धारण केलेला दिसत आहे.

अक्षयने व्हिडीओ शेअरच्या टीझर रिलीजची तारीखही अधिकृतपणे जाहीर केली आहे. या चित्रपटाचा टीझर 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशात या टीझरवर युजर्सच्या खूप मनोरंजक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘अक्षय कुमार तुमचा खूप आदर आहे, या चित्रपटात सनातनची खिल्ली उडवू नका.’, तर आणखी एका युजरने लिहिले, ‘आशा आहे की, यावेळी आमच्या सनातन धर्माची खिल्ली उडवली जाणार नाही, अन्यथा भगवान शिवाचे रुद्र तांडव खूप भयानक असेल’. अशात एका युजरने लिहिले की, ‘लूक पाहता चित्रपट हिट होईल असे वाटते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारचा ‘ओह माय गाॅड’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित  होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय यामी गौतम देखील दिसणार आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. अशात अक्षय आणि सनी देओलमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार आहे.(Bollywood actor akshay kumar shares new look from omg 2 teaser release date netizens says please do not hurt hindu sentiments)

अधिक वाचा- 
Birth Anniversary: ‘रामायण’ मधील रामाशी हाेताे तबस्सुम यांचे खास नाते, जाणून घ्या अभिनेत्रीशी संबंधित न ऐकलेले किस्से
अश्विनी महांगडेच्या ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्री म्हणाली, “शेवटचा भाग…”

हे देखील वाचा