बॉलिवूडमधील अनेक सिनेमे अडचणीत सापडले आहेत. कधी एखाद्या सीनमुळे, तर कधी सिनेमाच्या नावामुळे. यामध्ये काही राजकीय पक्षही आक्रमक भूमिका घेऊन सिनेमा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये पूर्ण क्षमतेने सिनेमा रिलीझ करण्याची परवानगीही मिळाली आहे, परंतु उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र सरकार अद्याप यावर विचार करत आहे. ‘सूर्यवंशी’ एक मोठा सिनेमा आहे. याच्या निर्मात्यांना चित्रपटगृहे शंभर टक्के क्षमतेने भरल्याशिवाय सिनेमा रिलीझ करायचा नाही. पण महाराष्ट्र सरकारने निर्णय देण्यास उशीर लावल्यामुळे निर्माते सिनेमा रिलीझ करण्यास मागे-पुढे पाहत आहेत.
हा सिनेमा रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. यामध्ये करण जोहर आणि अक्षय कुमारची आई, अरुणा भाटियाचाही पैसा लागलेला आहे. यापूर्वी सिनेमा होळीच्या जवळपास रिलीझ करायचे होते. त्यानंतर सिनेमा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीझ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, परंतु आतापर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. जर देशाच्या सर्वात मोठ्या सिनेमा वितरण क्षेत्र असलेल्या मुंबईत चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडली नाहीत, तर सिनेमा आपल्या पूर्ण क्षमतेने कमाई करू शकणार नाही.
परंतु लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, ‘मास्टर’ सिनेमा चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने खुली झाली असताना रिलीझ झाला होता. असे असूनही या सिनेमाने जबरदस्त कमाई केली होती. तरीही हे चित्रपट आणि अभिनेत्याच्या ब्रँड व्हॅल्यूवरही अवलंबून आहे.
आता माध्यमांमध्ये अशा चर्चा केल्या जात आहेत की, ‘सूर्यवंशी’ सिनेमा कदाचित चित्रपटगृहे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकसोबत रिलीझ होऊ शकतो. तरीही रिलायन्स एंटरटेनमेंटकडून ‘सूर्यवंशी’ सिनेमा चित्रपटगृहात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकसोबत रिलीझ करण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. आतापर्यंत चित्रपट निर्माते आणि वितरकांमध्ये करार झाला आहे की, कोणताही सिनेमा चित्रपटगृहात रिलीझ होण्याच्या आठ आठवड्यानंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो.
खरंतर परदेशी चित्रपट कंपनी वॉर्नर ब्रदर्सने सिनेमा चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकसोबत एकाच दिवशी रिलीझ करण्याची सुरुवात केली आहे. याचाच अर्थ असा की, ओटीटीचे वापरकर्ते सिनेमाला एक निश्चित फी देऊन एका निश्चित कालावधीसाठी घरबसल्या पाहू शकतात. ओटीटीपासून हे सिनेमे तीन ते चार आठवड्यानंतर काढून टाकले जातात आणि चित्रपटगृहात सिनेमे सुरूच राहतात.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ