बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जातात. त्या आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि माध्यमांमध्ये येतात. त्यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिचाही समावेश आहे. ती आज आपला ३७ वा वाढदविस साजरा करत आहे. तिचा जन्म ११ फेब्रुवारी, १९८४ रोजी हैदराबाद येथे झाला होता. तिने सन २००५ साली ‘टाईम पास’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. याव्यतिरिक्त तिने ‘कामसूत्र ३D’ आणि ‘दिल बोले हडिप्पा’ या चित्रपटातही काम केले आहे.
शर्लिन नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटोशूट शेअर करताना दिसते. शर्लिन बॉलिवूडमध्ये काही खास करू शकली नाही. परंतु तिने फिल्म इंडस्ट्रीबद्दल केलेले खुलासे चकीत करणारे आहेत. तिने केलेले ३ खुलासे असे होते, ज्यांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातली होती. तिने नुकताच एक खुलासा केला आहे. चला तर मग जाणून घेऊया शर्लिन चोप्राच्या खुलाश्याबद्दल…
https://www.instagram.com/p/BfFU4mhg2He/?utm_source=ig_web_copy_link
१. साजिद खानवर केला आरोप
नुकतेच शर्लिन चोप्राने साजिद खानबद्दल आश्चर्यकारक खुलासा केला होता. शर्लिनने ट्विटरवर एका पाठोपाठ एक असे ट्वीट केले होते. ज्यामध्ये तिने साजिद खानबद्दल खुलासा केला होता. तिने आरोप केला होता की, साजिद खान तिच्याशी वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होता. तिचे हे ट्वीट सगळीकडे व्हायरल होत आहे. साजिदसोबत आपला अनुभव शेअर करत शर्लिनने लिहिले होते की, ‘एप्रिल २००५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मी साजिदला भेटले, तेव्हा त्याने आपल्या पँटमधून आपले प्रायव्हेट पार्ट बाहेर काढले आणि मला ते पकडून फील करण्यास सांगितले. मला आठवते, मी त्याला म्हटले होते की, पेनिस कसे असते हे मला माहिती आहे आणि तुम्हाला भेटण्याचा माझा उद्देश ते पकडणे नाहीये.’
In 2019, I had done this interview in which I spoke about @SimplySajidK https://t.co/K31cDObLjl pic.twitter.com/AQqxEbc1qt
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)???????? (@SherlynChopra) January 19, 2021
२. ‘मी चेन-स्मोकर होते’- शर्लिन
सुपरस्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बॉलिवूडमध्ये ड्रग्जबाबत गोंधळ उडाला आहे. मागील वर्षी हे प्रकरण आले होते, तेव्हा शर्लिन चोप्राने बॉलिवूड पार्टींमध्ये ड्रग्सच्या वापराबद्दल आश्चर्चचकीत करणारा खुलासा केला होता. खरं तर शर्लिन चोप्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती योगा पोझमध्ये बसली होती. यामध्ये ती आपल्या फिटनेसचे गुपित सांगत होती. तसेच म्हणत होती की, ती योगा, न्यूट्रिशन आणि शिस्तीनुसार स्वत:ला फीट ठेवते.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने असे काही म्हटले होते की, त्यामुळे ती जबरदस्त चर्चेत आली होती. कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की, “मी चेन स्मोकर होते. ऑक्टोबर २०१७ मध्ये मी स्मोकिंग सोडले होते. मी सोशल ड्रिंकर होते. ड्रग्जपासून मी नेहमीच अंतर ठेवले आहे. इंडस्ट्रीवाले पार्टीमध्ये बोलावून ट्रेवर ड्रग्ज ऑफर करतात. परंतु घ्यायचे नाही.” या कॅप्शनमार्फत शर्लिनने बॉलिवूड पार्टींमध्ये ड्रग्जच्या वापरावर कमेंट करत हेही सांगितले होते की, या पार्टीमध्ये ही खूप क्षुल्लक गोष्ट असते.
३. कास्टिंग काऊच
मागील वर्षीच शर्लिन चोप्राने कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला होता. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “सुरुवातीला जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते आणि मला कोणीही ओळखत नव्हते. त्यावेळी चित्रपट निर्मात्यांशी जोडले जायचे आणि त्यांना म्हणायचे की तेही माझी क्षमता पाहतील, ज्यांना मी माझ्यात पाहते. मी आपल्या पोर्टफोलिओसोबत त्यांच्याकडे जात असायचे, त्यावेळी त्यांनी मला म्हटले होते की, ‘अच्छा ओके, ठीक आहे, आपण डिनरला भेटुया. मला वाटायचे की, कदाचित हा तोच डिनर असेल, ज्याला आपण सर्व लहानपणापासून ओळखतो. त्यामुळे मी विचारायचे की, मला डिनरवर केव्हा आले पाहिजे, तेव्हा ते मला रात्री ११ किंवा १२ वाजता यायला सांगायचे.”
“त्या लोकांचा ‘डिनर’चा खरा अर्थ तडजोड असायचा. जेव्हा असे चार ते पाच वेळा झाले, तेव्हा मला समजले की, ‘डिनर’चा खरा अर्थ काय असतो. त्याचा या इंडस्ट्रीमध्ये खरा अर्थ ‘माझ्या जवळ ये बेबी’ हा आहे,” असेही तिने पुढे म्हटले होते.
शर्लिनने या चर्चेत पुढे सांगितले होते की, “चित्रपट निर्मात्यांचा उद्देश समजल्यानंतर मी त्यांना नका देऊ लागले. यानंतर मी निर्णय घेतला की, मला ‘डिनर’ करायचा नाही. त्यानंतर जेव्हा मी कामावर जायचे आणि कोणीही मला त्या कोडवर्डमध्ये बोलायचे, तेव्हा मी म्हणायचे की, मी डिनर करत नाही, मी डायटवर आहे. तुम्ही ब्रेकफास्टसाठी बोलवा. लंचसाठी बोलवा. त्यानंतर त्यांचे कधीही प्रत्युत्तर येत नसायचे.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य
-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज