मेगास्टार अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेता अभिषेक बच्चनची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सततच काेणत्या ना काेणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहते. मात्र, सध्या ही अभिनेत्री न्यायालयाच्या नोटीसमुळे चर्चेत आली आहे. ऐश्वर्या रायने शिल्लक कर जमा न केल्याने तिच्यावर नोटीस बजावण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ऐश्वर्या रायच्या जमिनीवरील प्रलंबित कर लक्षात घेऊन नाशिकच्या तसलीदाराने अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे.
ऐश्वर्याची नाशिकच्या सिन्नर परिसरात पवनचक्कीसाठी जमीन
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) हिला नाशिक तहसीलदारांच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. तर झाले असे की, नाशिकच्या सिन्नर येथील आवाडी परिसरात ऐश्वर्याची पवनचक्कीसाठी जमीन आहे. या जमिनीचा एक वर्षाचा कर देय बाकी असून ताे 21,960 रुपये भरायचा आहे. ही बाब लक्षात घेऊन ही नोटीस बजावण्यात आली आहे.
ऐश्वर्याने वर्षभरापासून भरला नाही कर
या डोंगराळ भागात ऐश्वर्या रायची सुमारे 1 हेक्टर जमीन असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरापासून शिल्लक रकमेबाबत अभिनेत्रींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने आता तिच्याप्रती महसूल विभागाला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. यापुर्वी, ती मणिरत्नमच्या ड्रीम फिल्म पोन्नियन सेल्वन पार्ट-1 मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने राणी नंदिनीची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या दमदार यशानंतर निर्मात्यांनी पीएस-1 च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. (bollywood actor amitabh bachchan daughter in law abhishek wife aishwarya rai bachchan gets notice for not paying tax)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या बॉलिवूडस्टारला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकेल खेसारी लाल यादव ‘इतक्या’ कोटींची आहे संपत्ती
सुशांत सिंग राजपूतच्या जवळच्या सदस्याचे झाले निधन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बहिणीची माहिती