बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी त्यांच्या चाहत्यांना भेटतात. चाहत्यांना भेटण्यासाठी ते त्यांचे घर म्हणजेच ‘जलसा च्या बाहेर येतात. अशात मुंबईतील जुहू येथील बिग बींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते. अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी प्रत्येक आठवड्याचा रविवार एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. आपल्या चाहत्यांचा उत्साह समजून अमिताभ बच्चन देखील त्यांना कधीही निराश करत नाहीत आणि दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटायला येतात. मात्र, या रविवारी, 7 मे रोजी ते त्यांच्या चाहत्यांना भेटू शकणार नाही, अशी माहिती या सुपरस्टारने त्यांच्या ब्लॉगद्वारे दिली आहे.
अमिताभ बच्चन (amitabh bachchan) अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी मनातल्या भाावना शेअर करतात. अशात लेटेस्ट ब्लॉगमध्ये, बिग बींनी चाहत्यांना कळवले आहे की, ते या रविवारी त्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, ‘उद्या जलसाच्या गेटवर माझं जाण हाेणार नाही. कारण, मला काही काम आहेत . मी संध्याकाळी 5.45 पर्यंत परतण्याचा प्रयत्न करेन, पण उशीर होईल. त्यामुळे मी गेटवर न येण्याची माहिती देत आहे.’
View this post on Instagram
अमिताभ बच्चन लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर
अमिताभ बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता सध्या नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर अभिनेत्याला दुखापतही झाली होती. अशात अलीकडे, अभिनेत्याने रिभू दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित ‘सेक्शन 84’साठी पुन्हा काम सुरू केले आहे. यात डायना पेंटी, अभिषेक बॅनर्जी आणि निम्रत कौर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.(Bollywood actor amitabh bachchan informs fans will not come on sunday appearance due to work commitment)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या 71व्या वर्षी झीनत अमानचे सौंदर्य पाहून फॅशन डिझायनरची पटली खात्री; म्हणाला, ‘वेळेला मात देते…’
आनंदवार्ता! धर्मेंद्रचा नातू ‘या’ दिवशी अडकणार लग्न बंधनात, प्रेयसी द्रीशासोबत घेणार सात फेरे